CM Eknath Shinde : ‘ठाकरेंनी पवारांकडे दोन माणसे पाठवलीत अन्…’, 2019 च्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात शिंदेंचा आतापर्यंतचा मोठा गौप्यस्फोट!

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : दसरा मेळ्याव्यामध्ये आज शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार भाषणे केलीत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री खुर्चीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

CM Eknath Shinde : 'ठाकरेंनी पवारांकडे दोन माणसे पाठवलीत अन्...', 2019 च्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात शिंदेंचा आतापर्यंतचा मोठा गौप्यस्फोट!
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 10:06 PM

मुंबई : दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांनी भाषणांमधून एकमेकांवर जोरदार टीकेचे ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंनी तासभर भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकेचे बाण सोडत सभा गाजवली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंवर निशाणा साधत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी कशी फिल्डिंग लावली ते जाहीरपणे सांगितलं सांगत त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी सावध राहावं, असा सल्ला शिंदेंनी दिला आहे.

शिंदेनी 2004 पासूनचं सांगून टाकलं, म्हणाले…

बाळासाहेबांना मी शब्द दिला आहे शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, आम्ही विचारात पडलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार? मात्र हे महाशय टुनकन उडाले आणि खुर्चीत जाऊन बसले. मागचं पुढचं सगळं सोडलं आणि म्हणाले मला कुठे व्हायचंय, पवार साहेबांनी सांगितलं. यांनी पवारांकडे दोन माणसे पाठवली होतीत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा अशी विनंती केली. हे काही लपत नाही.

तुमचं 2004 पासून बसायचं ठरलं होतं मात्र जुगाड काही होत नव्हता. जसे विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले की आले रे आले, लगेच यांनी सांगितलं आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. अरे तुम्ही युतीत निवडणूका लढले दुसरे दरवाजे कसेकाय शोधायला लागले.

मुख्यमंत्री व्हायचंच होतं मात्र दाखवायचं नव्हतं, एक चेहरा आहे पण त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे दडले आहेत. भोळेपणाने तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावं, चेहऱ्यावर जावू नका, पोटातील पाणीही हालून दिलं नाही. पोटात एक ओठात एक असं आमचं काम नाही पण मी त्याचा साक्षीदार आहे. शेवटपर्यंत कळून दिलं नाही ना चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही. हीच खरी कमाल आहे आपल्याला दाखवून दिलं नाही. मुख्यमंत्री बनण्यासाठी संधी साधू बनल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.