AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वर्षा बंगला’ अडीच वर्ष बंद, पण चहापाण्यावर खर्च कसा ? एकनाथ शिंदे यांनी कोणाला घेतला चिमटा

आमच्याकडे गेल्या आठ-नऊ महिन्यात राज्यभरातून सोन्यासारखी माणसे येत आहे. त्यांच्यासाठी चहापाणी करायच नाही का? आपली ही संस्कृती नाही का?, असा सवाल त्यांनी केला.

'वर्षा बंगला' अडीच वर्ष बंद, पण चहापाण्यावर खर्च कसा ? एकनाथ शिंदे यांनी कोणाला घेतला चिमटा
वर्षा बंगला
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 3:59 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत सभागृहात वातावरण बदलून टाकले. आपल्यावरील व सरकारवरील आरोपांना उत्तर देताना विरोधकांना प्रेमाचे चार खडे बोल सुनावले. सभागृहात उद्धव ठाकरे यांचे नाव न घेताना खूप काही सांगून गेले. त्यांच्या भाषणाला सत्ताधाऱ्यांकडून चांगलीच दाद मिळाली. त्यावेळी विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो होऊ दिला नाही.

अजित पवार यांच्यासंदर्भात मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात बॅनर लागले होते. त्यात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. तसेच बॅनर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासंदर्भात लागले होते. त्यावरुन एकनाथ शिंदे यांनी दादा, आधी भावी मुख्यमंत्री कोण हे ठरवून घ्या, असे सांगताच सभागृहात हशा पिकला.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे यांना टोला

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील चहापाण्यावर २ कोटी ४० लाख रुपये खर्च झाल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्ष वर्षा बंगला बंद होता. केवळ फेसबुक लाईव्ह होत होते. कोरोना चाचणी केल्याशिवाय कोणाला प्रवेश नव्हता.

मग बंगला बंद असताना किती खर्च झाले, याची माहिती घेतली का? असा सवाल शिंदे यांनी अजित पवार यांना केला. आमच्याकडे गेल्या आठ-नऊ महिन्यात राज्यभरातून सोन्यासारखी माणसे येत आहे. त्यांच्यासाठी चहापाणी करायच नाही का? आपली ही संस्कृती नाही का?, असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी मागील काळात काय झाले ते सांगून दिले.

जाहिराती आणि अजित पवार यांना घेरले

अजित पवार यांनी जाहिरातीवर खर्च करता हा आरोप केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना चांगलेच घेरले. तेव्हा तुम्ही पीआरसाठी २५० कोटी ठेवले होते, तुम्ही तुमच्या वैयक्तीक पीआरसाठी सहा कोटी ठेवले होते. नंतर ते मागे घेतले. आम्ही सरकारच्या योजनांच्या जाहिरातीवर खर्च करतो. त्यात तुमच्या सकाळसह सामना या दैनिकातही जाहिरात देतो. मग एकीकडे घटनाबाह्य सरकार म्हणायचे आणि त्यांच्या जाहिराती सर्व सुविधा चालतात, असा टोला उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

कसबा पेठेत काँग्रेसचा विजय झाल्याबद्दल कोणाला किती आनंद झाला, त्याचा उल्लेख त्यांनी केला. हा प्रकार म्हणजे बेगानी शादी मे अब्दुला दिवाना… असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा लगावला.

तेव्हा दावोसमधील खुर्च्यासुद्धा मध्य प्रदेशातील पॅव्हेलनमधून आणल्या, एकनाथ शिंदे यांनी कोणाला मारला टोला

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.