राणे-ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये ‘पॉलिटिकल हिट?’

येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. (cm uddhav thackeray)

राणे-ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये 'पॉलिटिकल हिट?'
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 2:02 PM

मुंबई: येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. राणेंची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि जन आशीर्वाद यात्रेत राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (cm uddhav thackeray and narayan rane will come together in sindhudurg)

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रयत्नामुळेच चिपी विमानतळ सुरू होत असल्याचा दावा केला. त्यानंतर सोशल मीडियावरूनही शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये चिपीच्या श्रेयवादावरून चढाई सुरू झाली आहे.

कार्यक्रम कधी?

येत्या 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, स्थानिक खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे आणि राणे आमनेसामने येणार आहेत.

राणेंच्या दाव्यावर राऊतांची कुरघोडी

ज्योतिरादित्य ठाकरे हे विमानतळाचं उद्घाटन करतील. त्यासाठी मुख्यमंत्री हवाच असं काही नाही, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी आज पलटवार केला. कालच उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी 11 वाजता चर्चा झाली. यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं सांगतानाच काल 11 वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला 12 वाजता फोन करून सांगितलं की, आम्ही 9 तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, असं राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांना बोलवायचं की नाही बोलवायचं याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, राणे कोण लागून चालले? असा सवालही त्यांनी केला.

राणेंच्या विधानाशी भाजप असहमत?

दरम्यान, राणेंच्या विधानाशी भाजप नेते असहमती दर्शविताना दिसत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. मी प्रोटोकॉल अधिकारी नाही, पण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला असे वाटते की भले शिवसेनेचा प्रयत्नामुळे चिपी विमानतळ झालं नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढी मुळे झालं असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा सन्मान झाला पाहिजे. त्यांनी आलं पाहिजे असे माझे मत आहे, असं शेलार म्हणाले.

प्रोटोकॉल काय सांगतो?

विमानतळाच्या मालकीवरून शिवसेना आणि राणेंमध्ये जुंपली आहे. राणेंनी हे विमानतळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालीच असल्याचा दावा केला आहे. तर राऊत यांनी हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असं स्पष्ट केलं. मात्र, विमानतळाचा अधिकार कुणाकडेही असला तरी एखाद्या राज्यात एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन होत असेल तर त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना द्यावचं लागतं. कार्यक्रम पत्रिकेतही मुख्यमंत्र्यांचं नाव टाकावं लागतं. त्यामुळे केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ऑक्टोबरमध्येच पॉलिटिकल हिट

राणे यांना जन आशीर्वाद यात्रे दरम्यान अटक करण्यात आली होती. त्यामुळे राणे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ठाकरे-राणे एकाच मंचावर येत असल्याने राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. (cm uddhav thackeray and narayan rane will come together in sindhudurg)

संबंधित बातम्या:

बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको; विनायक राऊतांनी नितेश राणेंना डिवचले

Chipi Airport : चिपी विमानतळाचं उदघाटन नेमकं कधी? शिवसेना म्हणते 7 ऑक्टोबर, राणेंची तारीखही जाहीर

उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही, राणेंनी डिवचलं; चिपी विमानतळाच्या श्रेयावरून राणे आणि शिवसेनेत जुंपणार?

(cm uddhav thackeray and narayan rane will come together in sindhudurg)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.