Mumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (CM Uddhav Thackeray on Mumbai Rain Waterlogging)
मुंबई : मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. मुंबईत अवघ्या 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली. मुंबईतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. (CM Uddhav Thackeray on Mumbai Rain Waterlogging)
“मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज (5 ऑगस्ट) मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.”
कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2020
“कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
We request Mumbaikars to stay indoors and not venture out unless it’s extremely essential. Practice all necessary precautions and do not venture out near the shore or water logged areas. Please #Dial100 in any emergency. Take care & stay safe Mumbai #MumbaiRains
— Mumbai Police (@MumbaiPolice) August 5, 2020
“मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी. त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.”
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.
मुंबईसह उपनगरात मुसळधार
मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा, सायन, हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे.
दहिसर, बोरीवली, मालाड, कांदिवली गोरेगााव अंधेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पावसाचा चांगलाच परिणाम झालेला दिसला. (CM Uddhav Thackeray on Mumbai Rain Waterlogging)
संबंधित बातम्या :
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद
कोकणात मुसळधार पाऊस, रायगडमध्ये कुडंलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली