VIDEO: पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला दांडी, पालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दांडी मारली. मात्र, आज मुंबई पालिकेच्या अॅपच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित होते.

VIDEO: पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला दांडी, पालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 5:07 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दांडी मारली. मात्र, आज मुंबई पालिकेच्या अॅपच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी दृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमाला हजेरी लावत विरोधकांना जोरदार टोले लगावले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. दृश्यप्रणालीद्वारे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोले लगावले. मात्र, काल आजारपणाचं कारण देत पंतप्रधानांच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विरोधकांनीही यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत की मुंबईचे? असा सवाल विरोधकांनी केला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी आजच्या कार्यक्रमातून विरोधकांना जोरदार चिमटे काढले. कोविड काळात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी आपलं कौतुक केलं नाही. थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. दुषणं देणारे अनेक आहे. आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळं ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचं नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

तिळगुळाची वाट न पहाता काम करा

गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम करा. शासकीय प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतु, त्याला छेद देणारा आजचा उपक्रम आहे. महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

त्या कामाची माहिती नागरिकांना द्या

वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली आहे. महापालिका रोज काय काम करते? रोज गटार साफ करते, कचरा उचलते, रोज पाणी देते, ही सगळी कामे महापालिका कसे करते? घाणीत उतरून सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. महापालिकेवरचा कामाचा ताण करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

‘व्हॉट्सअप चॅट बॉट’वर मिळणार बीएमसीच्या 80 पेक्षा अधिक सुविधांची माहिती, नवा उपक्रम काय? वाचा सविस्तर

सेल्फ टेस्ट किटची माहिती पालिकेला देणे बंधनकारक, आयु्क्तांचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.