Uddhav Thackrey on ED: ईडी आहे की घरगडी, देवेंद्रजी तुम्हाला केंद्रानं घेतलं पाहिजे, फडणवीसांच्या आरोपांवर सीएम सुसाट

उद्धव ठाकरे यांनी काल विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, नेत्यांवर, मंत्र्यावर ईडीची कारवाई, नवाब मलिकांचा राजीनामा, दाऊद इब्राहिम या गोष्टीच्या पुढे तुम्ही गेलाच नाही. काल तुम्ही सांगितलेल्या विंदाच्या कवितेप्रमाणेच तेच ते तेच आहे असंं म्हणत त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.

Uddhav Thackrey on ED: ईडी आहे की घरगडी, देवेंद्रजी तुम्हाला केंद्रानं घेतलं पाहिजे, फडणवीसांच्या आरोपांवर सीएम सुसाट
Udhav thackrey cmImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 6:05 PM

मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (Assembly Budget Session) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) प्रश्न विचारण्यास काय अक्कल लागात नाही या वाक्याचा फडणवीसांनी खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयावर बोट ठेवत जोरदार हल्ला चढवला होता. तर आज शुक्रवारी मात्र उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) प्रत्येक विधानाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी काल विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, नेत्यांवर, मंत्र्यावर ईडीची कारवाई, नवाब मलिकांचा राजीनामा, दाऊद इब्राहिम या गोष्टीच्या पुढे तुम्ही गेलाच नाही. काल तुम्ही सांगितलेल्या विंदाच्या कवितेप्रमाणेच तेच ते तेच आहे असंं म्हणत त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.

यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यांपासून ते दाऊद इब्राहिमपर्यंत विरोधकांनी केलेल्या टीकेवर त्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी ईडी विषयी बोलताना देवेंद्र फडणवीसांना उद्देश्यून त्यांना म्हणाले की, केंद्राने तुम्हाला रॉ किंवा सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे होते.

ईडीला तुम्हीच माहिती दिली

तसेच वेगवेगळ्या नेत्यांवर ईडीकडून करण्यात येत असलेली कारवाई होते कारण ईडीला तुम्हीच माहिती दिली आहे, असं वाचलं आहे मी, ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

मी टीकेला-बदनामीला घाबरत नाही

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी सांगितले की, बोला मी टीकेला आणि बदनामीला घाबरत नसल्याचे सांगितले. विरोधक मलिकांचा राजीनामा मागतात यावर बोलताना त्यांनी सांगितले की, तथ्य असेल तर तेही करुच पण आरोपात तथ्य पाहिजे हेही त्यांनी अगदी जोरदार पणे सांगितले.

एजन्सी काय करतात

नवाब मलिक हे चार, चार, पाचवेळा निवडून येतो आणि मंत्री बनतो तरीही या गोष्टी केंद्राच्या यंत्रणांना माहीत नाहीत म्हणजे या पोकळ यंत्रणा झाल्या का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या गोष्टी माहिती नसणाऱ्या एजन्सी टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा एवढंच करतात का एजन्सी असा टोलाही त्यांनी लगावला. त्याच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, केंद्राने तुम्हाला रॉ किंवा सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे. ईडीला तुम्हीच माहिती दिली असल्याचं वाचलं आहे. मग हे ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही असे म्हणत त्यांनी ईडी कारवाईची खरपूस समाचार घेतला.

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray | महिनाभर दाऊद एके दाऊदच, सरकारनं काय केलं लक्षच नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Solapur Accident : वृद्ध बहिणीची भेट घेतली, हॉटेलमध्ये जेवण केले,घरी परतताना मायलेकीवर काळाचा घाला

सरकार एसटीच्या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलं, परबांनी भर विधानसभेत मान्य केलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.