Loudspeaker Issue: तर कुणाच्याही परवानगीची वाट पाहू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना आदेश काय?
Loudspeaker Issue: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
मुंबई: मशिदीवरील भोंगे (Loudspeaker Issue) उतरवण्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डेडलाईन उद्या संपत आहे. भोंग्याच्या मुद्द्यावरून ठाम असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra) उद्या तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था पाळण्याचे सक्त आदेश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखा. त्यासाठी कुणाच्याही परवानगीची वाट पाहू नका, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहे. मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आले होते. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रकारांचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कायदा सुव्यवस्था राखताना कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असंही त्यांनी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या राज्यातून आलेले लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थी बिघडवू शकतात असा इंटेलिजन्सचा रिपोर्ट आहे. तसेच 15 हजारांपेक्षा अधिक लोकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
Loudspeaker row: Maharashtra CM directs police ‘not to wait for anyone’s permission’ to maintain law and order
Read @ANI Story | https://t.co/KGftkXA4J4#UddhavThackeray #Maharashtra #LoudspeakerRow #RajThackeray pic.twitter.com/vtQ6ArI1Lo
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2022
13 हजार लोकांना नोटीसा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सक्षम असल्याचं पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सांगितलं. राज्य राखीव दल आणि होम गार्ड तैनात करण्यात आले आहे. तसेच 13 हजार लोकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर 15 हजाराहून अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देतानाच नागरिकांनी शांततेचं सहकार्य करावं असं आवाहन पोलीस महासंचालकांनी केलं आहे.
पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
87 एसआरपीएफ कंपनी 30 हजारावर होमगार्ड तैनात आहे. सर्व सीपींना सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही. तसेच पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. राज ठाकरेंना नोटीशीबाबत औरंगाबाद पोलिस आयुक्तांना माहिती आहे, असं पोलीस महासंचालकांनी सांगितलं.