मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन, 2.3 कोटी विद्यार्थी-शिक्षकांना लाभ, देशातील पहिलं राज्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (6 ऑगस्ट) महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन करण्यात आलं (Google classroom for Maharashtra).

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन, 2.3 कोटी विद्यार्थी-शिक्षकांना लाभ, देशातील पहिलं राज्य
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 7:57 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (6 ऑगस्ट) महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन करण्यात आलं (Google classroom for Maharashtra). महाराष्ट्र सरकार आणि गुगलच्या या भागीदारीमुळे राज्यातील जवळपास 2.3 कोटी विद्यार्थ्यी-शिक्षकांना याचा उपयोग होणार आहे. जी सूट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षणाचं पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगलसोबत भागीदारी केली आहे. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे टाकताना विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले. जी सूट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झाले आहे. अशात कोरोनाने आपल्याला उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करुन दिली,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

वर्क फ्रॉम होमसाठी सहकार्य करावे : मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे म्हणाले, “जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो. गुगलमुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबवताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सुटच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळीत सुरु होण्यास यामुळे मदत होईल.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

उपक्रमाची वैशिष्ट्ये

  • शिक्षणासाठी जी सूट, जीमेल, डॉक्स आणि ड्राईव्हसह क्लासरुम विनामूल्य उपलब्ध. कोठेही, केव्हाही शिकण्यास सक्षम.
  • गुगल क्लासरुममुळे शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, तपासण्यास मदत होणार, तसेच वर्गात किंवा ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधता येणार.
  • गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रश्नोत्तरांच्या स्वरुपातील प्रश्नावली आणि चाचण्या घेता येणार.
  • शिक्षकांना लवकर अभ्यास तपासण्यास, ग्रेड कोर्सवर्क करण्यात मदत होणार.

गुगल आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक : अजित पवार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे. यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी जी सूट आणि राज्यातील शाळांसाठी गुगल क्लास रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. गुगल क्लासरुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात. ते प्रश्न विचारु शकतात आणि शंकाचे निरसन करु शकतात.”

“कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजीटल क्रांतीचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांना याचा उपयोग करुन घेता येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याची सोय झाली आहे,” असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

शिक्षणातील अग्रेसर राज्य बनवणार : वर्षा गायकवाड

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, “सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन, ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. जी सूट फॉर एज्युकेशन आणि गुगल क्लासरुमसारखे विनामूल्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले. या परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करत असलेल्या सर्व शिक्षकांचे आभार. आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली. गुगलसोबत शिक्षण क्षेत्रातील नविन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी दीर्घकालीन भागीदारी अपेक्षित आहे.”

हेही वाचा :

ऑनलाईन शिक्षणाचा ‘व्हीस्कूल पॅटर्न’, महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत

राज्यात शिक्षणाचा नवा “बीड पॅटर्न”, दहावीच्या 47,000 विद्यार्थ्यांना घरबसल्या मोफत शिक्षण

‘व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी’, सोलापुरात मंदिर-मशिदीच्या भोंग्याद्वारे शिक्षणाचे धडे

Google classroom for Maharashtra

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.