Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांसमोरही आजी म्हणाल्या झुकेगा नहीं, तर मुख्यमंत्री म्हणतात असे शिवसैनिक बाळासाहेबांचा आशीर्वाद…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट त्यांच्या वरळीतल्या घरी दाखल होत चंद्रभागा शिंदे (Chandrabhaga Shinde Video) यांची भेट घेतली. यावेळी आजींनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर झुकेना नहीं म्हणत पुष्पा स्टाईलनं मुख्यमंत्र्यांनाही एक डायलॉग मारून दाखवला.
मुंबई : विरोधकांना पु्ष्पा स्टाईल झुकेगा नाहीं (Pushpa) म्हणत इशारा देणाऱ्या शिवसैनिक आजींची आज जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भेट घेतली आहे. या आजी शिवसेना भावनाबाहेरी आणि मातोश्रीबाहेरील आंदोलनात शिवसेनेच्या रक्षक बनून उभ्या राहिल्या होत्या. याच आंदोलनावेळी त्यांनी मारलेल्या पुष्पा सिनेमाच्या डायलॉगची चर्ची होती. आंदोलनावेळी आदित्य ठाकरे यांनीही या आजींना खास बोलावून भेट घेतली होती. आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट त्यांच्या वरळीतल्या घरी दाखल होत चंद्रभागा शिंदे (Chandrabhaga Shinde Video) यांची भेट घेतली. यावेळी आजींनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर झुकेना नहीं म्हणत पुष्पा स्टाईलनं मुख्यमंत्र्यांनाही एक डायलॉग मारून दाखवला. यावेळी असे शिवसैनिक म्हणजे मला बाळासाहेबांनी दिलेला आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी आजींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजेस ठाकरेही दिसून आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे व्यक्ती वयाने मोठी होत असते, पण ती मनाने नेहमी तरूण असली पाहिजे. तशा या आजही युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्याकडून या गोष्टी मी शब्दात बोलू शकत नाही, पण असे शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांनी मला दिलेला आशीर्वाद आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला आलो. काल आपण पाहिलं असेल, कडाक्याच्या उन्हात त्या बसल्या होत्या. आता त्यांनी जसं करून दाखवलं, झुकेगा नहीं, तसे झुकणारे शिवसैनिक नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
आजी भावूक झाल्या
यावेळी इथे जमलेल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपले प्रश्नही मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांना वर्षावर या तुमच्या अडचणी सोडवू असे आश्वासनही दिले आहे. यावेळी बोलताना या आजीही भावूक झाल्याच्या दिसून आल्या. म्हणाल्या साहेब, वहिनी आणि मुलं आल्यानं मला आनंद झाला. माझ्या घराला पाय लागले, असे म्हणत त्या भावूक झाल्या. तर तुमच्यामुळे आम्ही आहे, नाहीतर आम्ही काही नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही त्यांना सांगताना दिसून आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिठाईने तोंडही गोड केले, आदित्य ठाकरेंसहीत सर्वांनीही मिठाईचा आस्वाद घेतला. यावेळी या सर्वांसोबत मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवाराने काही फोटोही घेतले.
Ramdas Athawale: आठवलेंनी दंड थोपाटले, येत्या 10 मे रोजी रिपाइंची राज्यभर निदर्शने