TV9 Impact : 90 वर्षीय शिक्षिकेची मदतीसाठी हाक, विद्यार्थी राज-उद्धव यांचे तातडीने रणदिवे बाईंना फोन

तोत्के चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं. त्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली.

TV9 Impact : 90 वर्षीय शिक्षिकेची मदतीसाठी हाक, विद्यार्थी राज-उद्धव यांचे तातडीने रणदिवे बाईंना फोन
Raj Thackeray_Uddhav Thackeray teacher_Suman Randive
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 1:00 PM

मुंबई : चक्रीवादळाने नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेला, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संपर्क साधला आहे. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर, रणदिवे बाईंच्या (Suman Randive) विद्यार्थ्यांनी तातडीने दखल घेत, मदतीचं आश्वासन दिलं. तोत्के चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं. त्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. (TV9 Impact CM Uddhav Thackeray office and MNS chief Raj Thackeray called up and spoke to ex teacher Suman Randive gave assurance to provide necessary help)

मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने सुमन रणदिवे या मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेला संपर्क साधून आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात येईल अशी हमी देण्यात आली. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही रणदिवे बाईंशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडूनही मदतीचं आश्वासन देण्यात आलं.

नेमकं प्रकरण काय?

कोकणासह मुंबई उपनगरालाही तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे (Suman Randive) या 90 वर्षांच्या आहेत. सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तोत्के वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

“उद्धव मी तुला शिकवलंय”

“या चक्रीवादळामुळे आमच्या वृद्धाश्रमाचं खूप नुकसान झालं. छप्पर उडालं. सगळ्या वृद्धांना रात्री झोपायला त्रास होतो. मच्छर चावतात. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असातना मी तुला शिकवले होते. इथली परिस्थिती खूप खराब आहे. कृपया आम्हाला मदत कर”, असं शिक्षिका सुमन म्हणाल्या.

सुमन लक्ष्मीकांत रणदिवे या दादर इथल्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत शिक्षिका होत्या. तिथे त्या गणित आणि विज्ञान हे विषय शिकवत होत्या. त्या 1991 मध्ये निवृत्त झाल्या.

सुमन रणदिवे या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जयंत पाटील यांच्या माजी शिक्षिका आहेत. 1991 मध्ये त्या निवृत्त झाल्या. मात्र पतीचं निधन आणि काही काळाने झालेला मुलाचा मृत्यू, यामुळे सुमन रणदिवे या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ फाऊंडेशन” या वृद्धाश्रमात आहेत.

VIDEO : उद्धव ठाकरेंच्या शिक्षिकेचं वादळाने मोठं नुकसान 

सीएमओकडून संपर्क

संबंधित बातम्या 

उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला, 90 वर्षीय शिक्षिकेची आर्त हाक

CM Uddhav Thackeray office and MNS chief Raj Thackeray called up  to ex teacher Suman Randive gave assurance to provide necessary help

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.