Lockdown : 17 तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबतची माहिती नीट कळवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

17 तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबतची माहिती नीट कळवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

Lockdown : 17 तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबतची माहिती नीट कळवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 10:58 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला (CM Uddhav Thackeray On Lockdown-4) संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊन-4 ची घोषणा केली. लॉकडाऊन-3 ची मुदत येत्या 17 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे 17 तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबतची माहिती नीट कळवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (CM Uddhav Thackeray On Lockdown-4) जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

17 तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करुन ते कळवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते. लवकरच पावसाळा येत असून त्यातही साथीचे आणि इतर रोग येतात, कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल, यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्सना ते नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील, हे पाहावे असेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी औरंगाबादमधून या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन आरोग्य विषयक बाबींवर भर द्यावा लागेल, तसेच रिक्त पदे भरावी लागतील याविषयी विचार मांडले.

पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थिती जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत. याचा पुनरुच्चार करुन मुख्यमंत्री म्हणाले की, आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे ये जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल त्यामुळे संसर्ग वाढणार नाही.

कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असेही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray On Lockdown-4) म्हणाले.

मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता

आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात कोरोनाची मोठी संख्या पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे, मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्या साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत. मात्र, ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोनमध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे. पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या, अशी सूचना त्यांनी केली.

राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु

राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे. मात्र, आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसऱ्या राज्यात पाठवतो आहोत. मग एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत, त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल असे आम्ही रेल्वेला कळविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पुढील काळात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यांत सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागेल. मध्यंतरी मी विविध जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या होत्या त्यातही आरोग्याविषयी सुविधांच्या कमतरता जाणवल्या होत्या. आरोग्याच्या रिक्त जागाही भराव्या लागतील.

नागरिकांची प्राथमिक तपासणी करा 

गोवा हे महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्याएवढे आहे. त्यांनी घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करुन काही लक्षणे आहेत का ते तपासले. आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कोरोना नव्हे तर आजारांची प्राथमिक तपासणी केल्यास वेळेवर उपचार करुन संबंधित व्यक्तीस निरोगी करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योग विभागाने राज्यातील प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये किती परप्रांतीय मजूर काम करीत होते आणि त्यातले किती त्यांच्या राज्यात परतले आहेत, त्याचा आढावा घ्यावा. एकीकडे उद्योग सरु होताना कामगारांची कमतरता किती जाणवते आहे हे पहा आणि स्थानिकांमधून उपलब्ध करुन द्या, असेही मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray On Lockdown-4) म्हणाले.

संबंधित बातम्या :

Be Vocal for Local : लोकलसाठी व्होकल बना, लोकल वस्तू खरेदी करा’, पंतप्रधान मोदींचा स्वदेशी नारा

Aatm Nirbhar Bharat : पंतप्रधान मोदींनी सांगितले स्वावलंबी भारताचे पाच खांब

Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार

self reliance India : पराभव मंजूर नाही, स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज : मोदी

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.