Uddhav Thackeray : हाच तो ऐतिहासिक क्षण जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री निवास लवाजाम्यासह सोडलं, परत येणार का?

मुख्यमंत्री बोलून गेल्यानंंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या चार मागण्या थेट ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या होत्या. यातून तर मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात कुठेही मेळ होताना दिसत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदही सोडणार का? असाही सवाल आता विचारण्यात येत आहे.

Uddhav Thackeray : हाच तो ऐतिहासिक क्षण जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री निवास लवाजाम्यासह सोडलं, परत येणार का?
हाच तो ऐतिहासिक क्षण जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री निवास लवाजाम्यासह सोडलं, परत येणार का?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:59 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार हे त्यांच्याच पक्षातील शिवसैनिक आणि मंत्री (Shivsena) एकनाथ शिंदे यांनी अडचणीत आणलं आहे. काही वेळापूर्वीच जनतेला संबोधन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी मी आजच वर्षा बंगला सोडत असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा काही तासातच खरी ठरली आहे. त्यांनी सर्व साहित्यासह वर्षा बंगला (Varsha Bunglow) सोडला आहे. ते त्यांच्या मातोश्री या निवसस्थानीच आता मुक्कामी असणार आहेत. तर मला कुठल्याही आमदाराने मी मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यास सक्षम नसल्याचे सांगावे, मी एका मिनिटात राजीनामा देईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले होते. तसेच मुख्यमंत्री बोलून गेल्यानंंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या चार मागण्या थेट ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या होत्या. यातून तर मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात कुठेही मेळ होताना दिसत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदही सोडणार का? असाही सवाल आता विचारण्यात येत आहे.

मुख्यमंत्री बाहेर पडतानाचा व्हिडिओ

मुख्यमंत्री बाहेर पडताच पुष्पवर्षाव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडून बाहेर आले, तेव्हा बाहेर उभे असलेल्या शिवसैनिकांकडून त्यांच्या पुष्पवृष्टी करण्यात आली. लाखो शिवसैनिकांसाही हा क्षण हा भावनिक होता. यावेळी मुख्यमंत्री यांनी हात जोडत लोकांचे आभार मानले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही सुरू होती. शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याने मुख्यमंत्र्यांची गाडी या गर्दीतून वाट काढत हळू हळू पुढे सरकार होती. यावेळी पोलीस शिवसैनिकाना हटवण्याचे काम करत होते. मात्र शिवसैनिकही तरीही मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पुष्पवर्षाव हे करतच होते.

संपूर्ण परिवारही होता सोबत

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा संपूर्ण परिवार होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, तसेच धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हेही त्यांच्यासोबतच वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. नेहमी सुसाट निघणाऱ्या या गाड्या शिवसैनिकांच्या गर्दीमुळे यावेळी धीम्या गतीनं मातोश्रीकडे जात होत्या.

वर्षा बंगल्यावरील साहित्यही शिफ्ट केलं

मुख्यमंत्री त्यांचं साहित्य बाहेर काढतानाचे काही फोटोही समोर आले आहेत. यावेळी शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली होती. आम्ही काहीही झालं तरी मुख्यमंत्र्यांबोत आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांनी दिली आहे.

भाजप नेत्यांकडून टीकेची झोड

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत हल्लाबोल चढवला आहे. बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? विधिमंडळात शिवसैनिक नाही आमदार मतदान करतात. पुरे झालं, जनता विटली आहे, खिशातला राजीनामा बाहेर काढा आता…, असे ट्विट आता त्यांनी केले आहे.

अतुल भातखळकरांचं पहिलं ट्विट

अतुल भातखळकरांचं दुसरं ट्विट

एकनाथ शिंदे बंडखोरीबाबत रामदार आठवले यांनीही  भाष्य केलं आहे.  40 पेक्षा जास्त आमदार त्यांच्यासोबत आहेत, काँग्रेस ncp बरोबरचे गठबंधन चुकीचे आहे. ही त्या आमदारांची भावना होती, त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. राज्यसभा व विधान परिषद निवडणूक नंतर मविआ नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. असे म्हणत आठवले यांनीही महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.