Uddhav Thackeray : न्यायदेवतेचे आभार, राज्यपालांना टोला ते बंडखोरांना विरोध न करण्याचं शिवसैनिकांना आवाहन, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातील ठळक 10 मुद्दे

शासकीय, प्रशासकीय सहकाऱ्यांसह जनतेचेआभार मानले. सत्ता नको, केवळ तुमचे प्रेम हवे आहे, अशी साद घातली. बहुमत चाचणी आणि असले खेळ मला खेळायचेच नाहीत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा (CM Post) त्याग केला.

Uddhav Thackeray : न्यायदेवतेचे आभार, राज्यपालांना टोला ते बंडखोरांना विरोध न करण्याचं शिवसैनिकांना आवाहन, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणातील ठळक 10 मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 10:32 PM

मुंबई : सुप्रीम कोर्टाने (Supreme court) बहुमच चाचणी करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे उद्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. लोकशाहीचा पाळणा हालणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधताना म्हणाले. आतापर्यंतची वाटचाल तुमच्या सहकार्याने चांगली झाली. सरकार म्हणून काय केले. सुरुवातच रायगडला निधी देऊन केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. आता पीक विमा योजनेचे बीड पॅर्टनही करून घेतले, असे सांगतानाच त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. शासकीय, प्रशासकीय सहकाऱ्यांसह जनतेचेही त्यांनी आभार मानले. सत्ता नको, केवळ तुमचे प्रेम हवे आहे, अशी साद घातली. बहुमत चाचणी आणि असले खेळ मला खेळायचेच नाहीत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM Post) त्याग केला आणि येणाऱ्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे पाहू या…

  1. पवार, गांधी परिवाराचे आभार – ते म्हणाले, की मला विशेषत: शरद पवार साहेब आणि सोनियाजी यांचे विशेष आभार मानायचे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खास धन्यवाद द्यायचे आहेत. ज्यावेळी आपलीच माणसे सोडून गेली, दगा दिला, त्यावेळी यांनी साथ दिली.
  2. नामांतराला साथ दिली – नामांतराच्या ठरावाच्या वेळी मी, आदित्य, सुभाष देसाई आणि अनिल परब चारच शिवसेनेचे मंत्री होते. बाकी सगळे मंत्री तुम्ही इतर पक्षांचे. हा ठराव मांडल्यानंतर काँग्रेस असो, की राष्ट्रवादीने एका अक्षराने विरोध केला नाही. तातडीने मंजुरी दिली. त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांनी करून घ्यायचे होते ते नामानिराळे राहिले. दूर राहिले. ज्यांचा विरोध आहे, हे भासवले गेले ते सोबत राहिले.
  3. अनेकांना मोठे बनवले, मात्र… – शिवसेनेला 56 वर्ष झाली. मी लहानपणापासून शिवसेना पाहत आहे. रिक्षावाले टपरीवाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल हातभट्टीवालेदेखील शिवसेनेत पाहिले. त्यांना शिवसेनाप्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणले. त्यांना नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री बनवले. मोठी झाली माणसे. मात्र मोठी झाल्यानंतर ज्यांना मोठे केले ते विसरले. ज्यांना मोठे केले त्यांना सत्ता आल्यानंतर जे काही देता येईल, ते शक्य होते ते दिले. आजही ज्यांना देता येईल ते दिले. ते लोक नाराज आहेत.
  4. जनतेचे प्रेम – गेले चार-पाच दिवस मातोश्रीला आल्यावर लोक येत आहे. साधी माणसे येत आहेत. साहेब काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कमाल आहे. ज्यांना दिले ते नाराज. ज्यांना नाही दिले ते सोबत आहे. लोक हिंमतीने सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी. शिवसेना आणि याला म्हणतात शिवसैनिक. हे आपले नाते आहे. त्या नात्याच्या जोरावर शिवसेना मजबूत उभी राहिली. अनेक आव्हानं आली. पण या साध्या माणसाच्या साथीने परतवली आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. न्यायदेवतेचा निकाल मान्य – आज न्यायदेवतेने निकाल दिला आहे. न्याय देवता म्हटल्यावर न्याय देवतेचा निकाल मान्य असायलाच पाहिजे. आपण आपली बाजू मांडली पाहिजे. उद्या फ्लोअर टेस्ट आहे, जसे कोरोना टेस्ट तशीच. राज्यपाल महोदयांनी फ्लोअर टेस्ट करण्याचा आदेश दिला आहे. तो आदेश, त्याचे पालन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  7. राज्यपालांना टोला – राज्यपालांना मी धन्यवाद देतो. तुम्ही लोकशाहीचा मान राखलात. काही लोकांनी पत्र दिल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्ही फ्लोअर टेस्ट करायला सांगितली. त्याच बरोबरीने एक आठवण करून देतो. लोकशाहीचे पालन झाले पाहिजे. आम्ही करू , सर्वांनी करावे. 12 सदस्यांची यादी अडीच वर्ष लटकून आहे. ती मंजूर केली तर तुमच्या बद्दलचा आनंद द्विगुणित होईल.
  8. …तर आम्ही बाहेरून पाठिंबा देतो – जे दगा देणार देणार असे सांगितले जात होते, ते सोबत राहिले. आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अशोकरराव मला म्हणाले, आपल्या लोकांचा महाविकास आघाडीवर राग असेल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देतो. पण त्यांना म्हणावे या. वेड्यासारखे वागू नका. कालही मी आवाहन केले, की तुमची नाराजी कुणावर आहे. माझ्यावर आहे, राष्ट्रवादीवर आहे, काँग्रेसवर आहे, कुणावर आहे? नामांतर केल्यावर शिवसेनेने हिंदुत्व सोडले, असे वाटत असेल तर त्यापेक्षा मी काय करू, सुरतला गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा समोर सांगितले असते तर बोललो असतो. तुमच्या भावनांचा आदर आहे. पण तुम्ही समोर येऊन बोलायला हवे. मी प्रेसमधून बोलणार तुम्ही प्रेसमधून बोलणार. या भानगडी मला आवडत नाहीत. मला या लढाया करायच्या नाहीत,
  9. शिवसैनिकांना आवाहन – मुंबईत बंदोबस्त वाढवला जात आहे. केंद्रीय राखीव दल येईल. चीन बॉर्डरवरचे संरक्षण काढून सैनिक येतील. शिवसैनिकांना नोटीस दिल्या गेल्या आहेत. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला, त्यावेळी संपूर्ण रस्ते गुलालाने लाल झाले होते. त्यांच्या रक्ताने उद्या मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का, एवढी माणुसकी विसरलात? एवढे नाते तोडले? उद्या कोणी शिवसैनिकांनी अध्येमध्ये येऊ देऊ नका. उद्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. त्यांचे नातेवाईक मिलिट्री, पॅरा मिलिट्री असेल आजूबाजूच्या देशातील सैनिक असतील येऊ द्या. आमदारांचे जल्लोषात स्वागत झाला पाहिजे. लोकशाहीचा जन्म, लोकशाहीचा पाळणा हलताना जल्लोष झाला पाहिजे. शिवसैनिकांनी त्यांच्या रस्त्यात येऊ नये. तुमच्या मार्गात कोणी येणार नाही. या घ्या शपथ. उद्या काय होणार. सेनेकडे किती आमदार आहेत भाजपाकडे किती आहेत. कशाला डोकी मोजायची. ती कामासाठी वापरायची नाही का? असा सवास त्यांनी केला
  10. …तर हे माझ्यासाठी लज्जास्पद – माझ्या विरोधात कोण आहे, किती आहेत, त्यात मला रस नाही. मात्र माझ्याविरोधात एक जरी माणूस गेला, तर माझ्यासाठी लज्जास्पद आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
  11. बहुमताचा खेळ खेळण्यात रस नाही – उद्या तुम्ही बहुमत सिद्ध कराल, इतरांना सोबत घेऊन. मला त्यात रस नाही. मला हा खेळच खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला, शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले, साध्या शिवसैनिकांना मोठे केले, त्या शिवसेनाप्रमुखाच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरात पडत असेल, तर पडू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवला हे पाप माझे आहे. त्या पापाची फळे भोगावी लागत असतील, तर त्यांचा काय दोष आहे, असे म्हणत उद्या ते अभिमानाने सांगितली, बघा शिवसेना प्रमुखांनी मला इथपर्यंत आणले. पण त्यांच्या पुत्राला आम्ही उतरवला की नाही, हे पुण्य घेऊन ते गावागावात हिंडतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.