Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय हवा कशीही असू द्या, मलबार हिलची हवा चांगली असते; मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

राजभवानातील नव्या दरबार हॉलचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले. जुनं ते कायम ठेवून आपण ही वास्तू नव्याने उभी केली आहे. या वास्तूचं सौंदर्य अप्रतिम असंच आहे. पुन्हा एकदा नव्या दमाने ही वास्तू उभी आहे.

राजकीय हवा कशीही असू द्या, मलबार हिलची हवा चांगली असते; मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
राजकीय हवा कशीही असू द्या, मलबार हिलची हवा चांगली असते; मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 1:11 PM

मुंबई: राजभवानातील  (rajbhavan) नव्या दरबार हॉलचे आज राष्ट्रपतींच्या (president) हस्ते उद्घाटन झाले. जुनं ते कायम ठेवून आपण ही वास्तू नव्याने उभी केली आहे. या वास्तूचं सौंदर्य अप्रतिम असंच आहे. पुन्हा एकदा नव्या दमाने ही वास्तू उभी आहे. या परिसरातील हवा खूप थंड असते. राजकीय हवा कशीही असू द्या. पण मलबार हिलची हवा चांगली असते, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) यांच्या हस्ते आज राजभवनातील नव्या दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवरांसह आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते.

नव्या वास्तूचं सौंदर्य अप्रतिम असं आहे. तुम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने ही वास्तू उभी केली आहे. कदाचित हे देशातील सर्वोत्तम राजभवन असेल. या वास्तुला 50 एकरची जागा लाभली आहे. एका बाजूला अथांग समुद्र आहे. दुसऱ्या बाजूला गर्द हिरवीगार झाडी आहेत. या परिसरातील हवा थंड असते. राजकीय हवा कशी असू द्या. पण मलबारहिलची हवा चांगली असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. या आवारात मोरही आहेत. विषारी नागही आहेत. सर्प मित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो, असंही ते म्हणाले.

वास्तू नव्या दमाने सज्ज

या संपूर्ण वास्तूचं वर्णन करायचं म्हणजे जुना वारसा कायम ठेवून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. या वास्तूने ऊन, वारा आणि पावसाचा तडाखा सोसला आहे. त्यामुळे वास्तूची थोडी नासधूस होते. म्हणून वास्तूची रचना कायम ठेवून ही वास्तू आपण जपली आहे. आपण जुन्याची मोडतोड करून नव्याकडे जात असतो. पण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. आपण मॉर्डन तर आहोतच. मॉर्डन व्हायचं आहे. पण संस्कृतीही जपायची आहे. पारतंत्र्याच्या घडामोडी बघणारी वास्तू आता लोकशाहीच्या सशक्त अशा पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी नव्या दमाने सज्ज झाली आहे, असं ते म्हणाले. नव्या वास्तूत चांगल्या घटना घडतील. आनंददायी घटना घडतील अशी अपेक्षा करतो, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Schools | औरंगाबादेत सोमवारपासून पहिली ते चौथीचे वर्गही भरणार, परीक्षेच्या तारखांबाबत शाळांचा काय निर्णय?

Fact Check : दहावी बारावीच्या परीक्षा रद्दच्या व्हिडीओची लिंक तुमच्या व्हॉटसअपवर आलीय, जाणून घ्या त्या मागील सत्य

Maharashtra News Live Update : आपल राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन, इथली हवा शांत : उद्धव ठाकरे

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.