जेव्हा राज यांनी अमित ठाकरेंना ‘कॉर्नर’ दाखवला!
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतल्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचं दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अनावरण झालं. (cm uddhav thackeray unveiled Balasaheb Thackeray statue in mumbai)
मुंबई: शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतल्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचं दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अनावरण झालं. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून ते राज ठाकरे, प्रवीण दरेकरांपर्यंत अनेक नेते उपस्थित होते. नेत्यांच्या या मांदियाळीत अमित ठाकरेही उपस्थित होते. पण जेव्हा नेत्यांची फोटो काढण्याची वेळ आली तेव्हा राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना खुणावले आणि दिग्गजांच्या मांदियाळीतून दूर होण्याच्या सूचना केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. शरद पवार कार्यक्रमस्थळी आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
राज यांची समयसूचकता
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह सर्वच नेत्यांनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर सर्वच नेते फोटो काढण्यासाठी पुतळ्याजवळ उभे राहिले. तेवढ्यात राज यांनी अमित ठाकरे यांना बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बोलावलं. समोर असलेली फुले घेण्याचे त्यांनी अमित यांना बोटानेच खुणावले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी पुष्प अर्पण करून बाळासाहेबांना अभिवादन केलं. बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर अमित नेत्यांच्या मांदियाळीत उभे राहिले. राज यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच अमित यांना तिथून बाजूला जाण्यास खुणावलं. अमित ठाकरेही लगेचच तिथून बाजूला झाले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या बाजूला जाऊन उभे राहिले. (cm uddhav thackeray unveiled Balasaheb Thackeray statue in mumbai)
VIDEO : बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण LIVE#balasahebthackeray @CMOMaharashtra @OfficeofUT @ShivsenaComms pic.twitter.com/MxyUuKMMN5
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 23, 2021
संबंधित बातम्या:
Balasaheb Thackeray Statue unveiling Live | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण
Balasaheb Thackeray Statue unveiled | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा
बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवू नये – भाजप
(cm uddhav thackeray unveiled Balasaheb Thackeray statue in mumbai)