AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत

पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. | Sanjay Raut

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत
संजय राऊत, शिवसेना
| Updated on: Feb 24, 2021 | 10:21 AM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (CM Uddhav Thackeray never spare anyone when it comes to law implementation)

संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले. पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री आणि शरद पवार नाराज आहेत का, याबाबत बोलण्यास राऊत यांनी नकार दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार का?, संजय राठोड म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide) प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आणि पोहरादेवीत (pohradevi) शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आज वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) मुंबईच्या दिशेने कॅबीनेट बैठकीसाठी रवाना झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार का?, असा सवाल विचारल्यावर वेळ मारुन नेत मी कॅबीनेट बैठकीसाठी चाललोय, असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं.

माझं रितसर काम सुरु झालंय. तसंच माझ्या शासकीय कामांनाही मी सुरुवात करतोय. त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीसाठी मी मुंबईला रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोहरादेवी गर्दीवर मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….

(CM Uddhav Thackeray never spare anyone when it comes to law implementation)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.