अनिल देशमुख यांच्याविरोधात पहिली तक्रार दाखल, तक्रारीत शरद पवार यांचंही नाव

भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे," अशी मागणी करण्यात आलीये. (anil deshmukh corruption allegations)

अनिल देशमुख यांच्याविरोधात पहिली तक्रार दाखल, तक्रारीत शरद पवार यांचंही नाव
जयश्री पाटील आणि अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 8:48 PM

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलीचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या आरोपानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये. अ‌ॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली आहे. ” भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे,” अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केलीये. (complaint registered against Anil Deshmukh under corruption allegations)

तक्रारीमध्ये शरद पवारांचं नाव

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत,” असं पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटंलय. तसेच, यामध्ये मास्टरमाईंट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपीही पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये केलाय.

पॉवरपुल असले तरी गुन्ह्यातून सुटका करता येत नाही

यावेळी जयश्री पाटील यांनी या प्रकरणात मोठे नेते असले तरी कोणाचीही गुन्ह्यातून सुटका करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचे सांगितले. तसेच, अनिल देशमुख, सचिन वाझे, शरद पवार यांच्या संदर्भातील संभाषणाचे पुरावे जतन होणे गरजेचे असल्याचेसुद्धा पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी राष्ट्रवादीचे पुढारी म्हणून कारावाई नाही

जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे स्वत:च गृहमंत्री असल्यामुळे कारवाई होत नसल्यचं पाटील यांनी म्हटलंय. “जेव्हा एखादा प्रकार निदर्शनास येतो. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून तत्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मात्र, या गुन्ह्यामध्ये तशी कारवाई होताना दिसत नाही. आरोपी हे स्वत: गृहमंत्रालयाचे प्रमुख आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पुढारी आहेत. त्यामुळे कायदेशी प्रक्रिया पार पाडली गेली नाही. किंवा परमबीर सिंग यांनी तशी हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणामध्ये संबंधितांविरुध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे,” असा आरोप पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.

दरम्यान, पाटील यांनी तक्रार दाखल केली असली तरी, देशमुख यांच्याविरोधत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. पाटील यांच्या तक्रारीनंतर  आता मुंबई पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

Parambir Singh Letter : अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, मुख्यमंत्री काय कारवाई करणार?

नवी मुंबईत ‘जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र’, पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचं ‘मिशन लसीकरण’ जोरात!

गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल

(complaint registered against Anil Deshmukh under corruption allegations)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.