असंघटित कामगारांसाठी काँग्रेसचे पुन्हा एक अभियान ; ‘या’ अभियानातून घराघरात जाणार

असंघटित कामगारांचे दुर्दैव असे की त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. ते काम आम्ही सर्वांनी शिरावर घेतलेला आहे. त्यांची नोंदणी करणं, त्यांना मिळणारे फायदे ही सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी कोणत्या प्रकारे पोहचवता येईल याचाही अभ्यास केला जाणार आहे.

असंघटित कामगारांसाठी काँग्रेसचे पुन्हा एक अभियान ; 'या' अभियानातून घराघरात जाणार
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 11:42 PM

मुंबईः भारत जोडो अभियान नंतर आता काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू करण्यात आले आहे. आज मुंबईतील राजीव गांधी भवन कार्यालयात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि महाराष्ट्र अध्यक्ष सुनील शिंदे व राष्ट्रीय अध्यक्ष, असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस आणि राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. उदित राज यांच्या उपस्थितीत अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानामध्ये असंघटित कामगार निधी कशा प्रकारे कामगारांसाठी उपयुक्त ठरतील यासाठी जनजागृती व राज्य सरकारला जाब विचारणार असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

असंघटित कामगार हा देशातला मोठा वर्ग आहे. 39 कोटी लोकांची रोजी रोटी ही हातावर पोट अशा अवस्थेत आहे. त्यांच्यासाठी असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसची संघटना गठित झालेली आहे.

या सर्वांना संघटित करण्याचं काम देश पातळीवर राज्य पातळीवर शहर पातळीवर केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. असंघटित कामगारांचे दुर्दैव असे की त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.

ते काम आम्ही सर्वांनी शिरावर घेतलेला आहे. त्यांची नोंदणी करणं, त्यांना मिळणारे फायदे ही सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवणे ते पोहचवण्यासाठी कोणत्या प्रकारे पोहचवता येईल याचाही अभ्यास यावेळी केला जाणार आहे.

अशा पद्धतीचे काम करणाऱ्या कामागाराच्या घरापर्यंत, नाक्यापर्यंत, रंग काम करत असेल, प्लंबर असतील घर काम करत असतील तर त्यांच्या घरामध्ये आम्ही हात से हात जोडो अभियानाच्या माध्यमातून या सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस सरकारच्या काळात साडेआठ हजार कोटी निधी देण्यात आला आहे मग तुम्ही या कामगारांसाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी काय करणार असा जाब सरकारला या माध्यमातून विचारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.