मी धडाधड निर्णय घेणाऱ्या दोन नानांना ओळखतो, एक पटोले, दुसरे…. : अशोक चव्हाण

आगामी सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवावा यासाठी सगळ्यांकडून शुभेच्छा आहेत. ही निवडणूक लोकाभिमुख आहे त्यामुळे वेगळा आनंद आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले. | Ashok Chavan

मी धडाधड निर्णय घेणाऱ्या दोन नानांना ओळखतो, एक पटोले, दुसरे....  : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 7:48 PM

मुंबई: मी धडाधड निर्णय घेणाऱ्या दोन नानांना ओळखतो. एक नाना पाटेकर आणि दुसरे आमचे नाना पटोले (Nana Pataole), असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले. नाना पटोले यांना पाहिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही थरकाप उडायचा, असेही चव्हाण यांनी म्हटले. (Nana Patole is lucky president becasue now Shivsena supporting congress)

नाना पटोले यांनी शुक्रवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक चव्हाण यांनी खास शैलीत नाना पटोले यांचे कौतुक केले. मी धडाधड निर्णय घेणाऱ्या दोन नानांना ओळखतो. एक नाना पाटेकर आणि दुसरे आमचे नाना पटोले, असे त्यांनी म्हटले.

मी नाना पाटोले यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या आयुष्यातला हा महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र काँग्रेसची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवावा यासाठी सगळ्यांकडून शुभेच्छा आहेत. ही निवडणूक लोकाभिमुख आहे त्यामुळे वेगळा आनंद आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.

‘नाना तुम्ही भाग्यवान, आता शिवसेना आपल्यासोबत’

अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात शिवसेना सोबत आल्यामुळे आपली ताकद वाढल्याचा उल्लेख केला. नाना तुम्ही भाग्यवान आहात. एकेकाळी मी आणि सुशीलकुमार शिंदे जेव्हा अध्यक्ष होतो, तेव्हा आमची लढाई भाजप आणि शिवसेनेसोबतही होती. मात्र आता शिवसेनेसोबत आपली आघाडी आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.

सोनिया गांधींच्या घराबाहेर नाना पटोले दिसताच उदयनराजेंनी गाडी थांबवली अन्….

काही दिवसांपूर्वीच नाना पटोले (Nana Patole) यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर नाना पटोले सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी गेले होते. नेमक्या त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी त्याच परिसरातून जात होती. तेव्हा उदयनराजेंनी नाना पटोले यांनी गाडीतून पाहिले आणि त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली.

यानंतर उदयनराजे यांनी गाडीतून उतरून थेट नाना पटोले यांनी भेट घेतली. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उदयनराजेंनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर एकमेकांची जुजबी विचारपूस करुन हे दोन्ही नेते आपापल्या दिशांना मार्गस्थ झाले. साधारण तीन दिवसांपूर्वी ही भेट झाली होती. त्याबद्दल अनेकांना माहितीदेखील नव्हती. मात्र, आता या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया नेहमीप्रमाणे उंचावल्या आहेत. तसेच तर्कवितर्कांना उधाणही आले आहे. यावर नाना पटोले आणि उदयनराजे भोसले यांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

संबंधित बातम्या:

सोनिया गांधींच्या घराबाहेर नाना पटोले दिसताच उदयनराजेंनी गाडी थांबवली अन्….

(Nana Patole is lucky president becasue now Shivsena supporting congress)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.