AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीचा दिवस हा स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. (nana patole)

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव
nana patole
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 1:27 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान फाळणीचा दिवस हा स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठ्या कष्टाने मिळालेले आहे. या स्वातंत्र्यासाठी मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. परंतु स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भाजप 14 ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करत आहे. हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. (congress leader nana patole slams bjp over Partition Horrors Remembrance)

काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताबरोबर जे देश स्वतंत्र झाले त्या देशात हुकुमशाही सत्ता सुरू झाली. परंतु, जगातील सर्वात मोठा व गौरवशाली लोकशाही देश म्हणून भारताचा जगात लौकीक आहे. भाजपा त्याला तिलांजली देऊ पाहत आहे. 14 ऑगस्ट हा फाळणीचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे. त्या रक्तरंजित दिवसाच्या स्मृतींना उजाळा देत नरेंद्र मोदी व भाजप देश तोडण्याचे काम करत आहे. जातीय तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचण्याचे भाजपाचे हे मनसुबे काँग्रेसचा कार्यकर्ता हाणून पाडेल, असं पटोले म्हणाले.

काँग्रेस पुन्हा भरारी घेईल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या सक्षम नेतृत्वाने केंद्र सरकारविरोधात आव्हान उभे केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विचाराचा विजय व्हावा यासाठी समर्पक भावनेने काम करा, काँग्रेस पक्ष पुन्हा भरारी घेईल आणि देशाची लोकशाही व्यवस्था व संविधान अबाधित ठेवू, असेही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रा. प्रकाश सोनावणे, प्रमोद मोरे, राजाराम देशमुख, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

हिंदू-मुस्लिम वाद लावायचा आहे का?

14 ऑगस्ट हा फाळणी भीषण स्मृतीदिन म्हणून पाळण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय हा भविष्यातील धोक्याची घंटा आहे. 14 ऑगस्ट 1946 रोजी देशात दोन समुदायामध्ये मोठा रक्तपात झाला होता. नरेंद्र मोदींना आता पुन्हा त्या रक्तपाताची आठवण करुन द्यायची आहे का? देशात पुन्हा रक्तपात करावयाचा आहे का? असा खडा सवाल पटोले यांनी काल नागपुरात विचारला होता. 14 ऑगस्टच्या फाळणीच्या वेदनेची आठवण म्हणून स्मृतीदिनाच्या आडून देशातील हिंदू-मुस्लीम वाद उभा करायचा भाजपाचा कुटील हेतू दिसत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तेसाठी भाजपा हे पाप करत आहे का? अशी शंकाही उपस्थित करुन मोदींचा व भाजपाचा डाव ओळखा आणि या शक्तीविरोधात काँग्रेसची शक्ती उभी करा, असे आवाहन त्यांनी केले.

अहिंसा व मनुष्यशक्तीच्या बळावर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा कधीच सहभाग नव्हता, मानवता व त्यागाशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांचे सरकार सध्या केंद्रात सत्तेवर आहे. मोठ्या कष्टाने व बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर संविधान मिळाले ते स्वातंत्र्य व संविधान वाचेल की नाही, टिकेल की नाही याची शंका निर्माण करणारे वातावरण सध्या देशात आहे, असंही ते म्हणाले. (congress leader nana patole slams bjp over Partition Horrors Remembrance)

संबंधित बातम्या:

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला

काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही, पण…; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा भाजपवर निशाणा

Independence Day Live Updates : कोरोनाचे नियम पाळा, लवकर कोरोनाला हद्दपार करु- उद्धव ठाकरे

(congress leader nana patole slams bjp over Partition Horrors Remembrance)

पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.