राज ठाकरे एका गोष्टीवर ठाम नसतात, सतत भूमिका बदलतात; अयोध्या दौऱ्यावरुन काँग्रेसचे टीकास्त्र
आतापर्यंत मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही. | Sachin Sawant
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे हे कोणत्याही एका गोष्टीवर ठाम नसतात. त्यांच्या भूमिका सतत बदलत राहतात, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मार्च महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे मनसैनिकांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे. (Congress leader Sachin Sawant take a dig at Raj Thackeray)
या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर उपरोधिकपणे निशाणा साधला. आतापर्यंत मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही. मनसेच्या भूमिकेत वारंवार बदल होतच राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांचं एक ठाम असं काही नसतं, असे सचिन सावंत यांनी म्हटले. त्यामुळे आता ‘मनसे’कडून काँग्रेसच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अण्णा हजारे पाच वर्ष झोपले होते: सचिन सावंत
अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून अण्णा हजारे यांचे मन वळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी अण्णा हजारे यांना टोला लगावला. अण्णा हजारे पाच वर्ष शांत झोपले होते. आता किमान त्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. भाजपने त्यांची मनधरणी करण्याऐवजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे लक्ष द्यावे, असे सचिन सावंत यांनी म्हटले.
राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचीही घोषणा, अयोध्येला जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Ayodhya) यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या:
मनसेचा मेगाप्लॅन, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा ठरला, निवडणुकीसाठी रणनीती आखली
राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचीही घोषणा, अयोध्येला जाणार!
ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेच्या वर्चस्वाला हादरा, पक्षश्रेष्ठी राणेंवर खुश; अमित शाह कोकणात येतलेत
(Congress leader Sachin Sawant take a dig at Raj Thackeray)