काहीही झालं तरी काँग्रेस नेहमीच संभाजीराजेंच्या पाठिशी- नाना पटोले

संभाजी राजेंनी निवडणुकीतून घेतलेल्या माघारीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला.

काहीही झालं तरी काँग्रेस नेहमीच संभाजीराजेंच्या पाठिशी- नाना पटोले
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 3:08 PM

मुंबई : संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज आपण राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. पण त्याचसोबत आपण समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेस नेहमीच संभाजी राजेंच्या पाठीशी असेल असं सांगितलं आहे. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.

काँग्रेस संभाजी राजेंच्या पाठिशी

संभाजी राजेंनी निवडणुकीतून घेतलेल्या माघारीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला. ते म्हणाले,”संभाजी राजे यांनी राज्यसभेत जायला हवं अशीच काँग्रेसची कायम भूमिका होती. त्यांच्यामुळे राज्यसभेत महाराष्ट्राची वेगळी शान होती. काँग्रेस नेहमीच संभाजी राजेंच्या पाठीशी असेल”, असं सांगितलं आहे. शिवसेनेने राजेंना उमेदवारी द्यायला हवी होती असं वाटतं का? असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा, “मला माहिती नाही शिवसेनेसोबत त्यांचं काय झालं ते”, असं पटोले म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.

मनसेची भूमिका काय?

संभाजी राजे यांची राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणं अनेकांच्या जिव्हारी लागलंय. गजानन काळे यांनी संभाजी राजेंच्या या निर्णयावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केलंय. छत्रपतींना असं व्यथित होताना पाहणं वेदनादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. संभाजी राजेंबाबत बोलताना त्यांनी शिवसेनेलाही लक्ष केलं. “उठता बसता महाराजांचं नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायची लायकी नाही असंच म्हणावं लागेल. बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत”, असं गजानन काळे म्हणालेत.

संभाजी राजे यांची निवडणुकीतून माघार

राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलंय. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी हा हा निर्णय घेतला असल्याचं संभारीज राजे यांनी म्हटलंय. मी राज्यसभा निवडणूक लढवत नसलो, तरी ही माघार नाही आहे, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला खडसावलं आहे. माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे. कुणापुढे झुकून मला राज्यसभेची खासदारकी नको आहे, असंही ते म्हणालेत. तसंच सर्वपक्षीयांची मदत मला अपेक्षित होती, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.