Corona effect : मुंबईत बालकांच्या मृत्यूदरात वाढ; जन्मदर घटला

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बालकांच्या मृत्यूदरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच याबाबत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार मुंबईत बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

Corona effect : मुंबईत बालकांच्या मृत्यूदरात वाढ; जन्मदर घटला
मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 10:08 AM

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बालकांच्या मृत्यूदरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच याबाबत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार मुंबईत बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मृत्यूंमध्ये वाढ होण्यामागे कोरोनाचा प्रादुर्भाव हे महत्त्वाचे कारण असू  शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. एकीकडे बालकांचा मृत्यूदर वाढला असताना दुसरीकडे मात्र जन्मदर कमी झाला आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये जन्मदरात सुमारे 20  टक्के घट झाली असून, मृत्यूदर 20 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून जन्मदरात घट

महापालिकेने सादर केलेल्या आकेडवारीनुसार 2018  मध्ये 1 लाख 51 हजार 187 बालकांचा, तर 2017 मध्ये 1 लाख 55 हजार 386 बालकांचा जन्म झाला. हे लक्षात घेता 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 4 हजार 199 बालकांचा जन्म कमी झाला आहे. 2019 मध्येही हीच परिस्थिती होती. 2019  मध्ये मुंबईत 1 लाख 48 हजार बालकांचा जन्म झाला. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 2289 बालके कमी जन्माला आली. 2020 मध्ये कोरोना काळात देखील हीच परिस्थिती कायम राहिली.  या काळात मुंबईमध्ये केवळ 1 लाख 20 हजार 188 बालकांचा जन्म झाला. तर 2021 च्या ऑक्टोबरपर्यंत 89 हजार 292 बालके जन्माला आली.

स्थलांतरामुळे जन्मदरावर परिणाम

याबाबत बोलताना  पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, कोरोनाचा परिणाम हा जन्म, मृत्यूवर झाला आहे. मुंबईत जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त होता आणि कडक लॉकडाऊन होते, तेव्हा मोठ्या संख्येने लोक आपल्या कुटुंबासह शहराबाहेर गेले. मुंबईत दर वर्षी सुमारे दीड लाख बालके जन्माला येतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात कामगारवर्ग आपल्या कुटुंबासह स्थलांतरित झाला होता. परिस्थिती सुधारल्यावर ते मुंबईला परतले, मात्र त्यांचे कुटुंब गावीच राहिल्याने जन्मदरात घट झाली आहे.

संबंधित बातम्या 

Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

Nawab Malik | मलिकांविरोधात आणखी एक अब्रू नुकसानीचा दावा, तर समीर वानखेडे मुदतवाढ नाकारणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.