दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात, अमरावतीत चार रुग्ण, धोका वाढला

यवतमाळ आणि अमरावतीमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती कोरोना टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. शशांक जोशी (Shashank Joshi) यांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा नवा स्ट्रेन महाराष्ट्रात, अमरावतीत चार रुग्ण, धोका वाढला
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 1:47 PM

मुंबई : “राज्यात नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा हा नवा स्ट्रेन आहे. यवतमाळ आणि अमरावतीमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं वेगळी आहेत तसंच त्याचा संसर्ग अधिक वेगाने होतो आहे”, अशी माहिती कोरोना टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. शशांक जोशी (Shashank Joshi) यांनी दिली आहे. (Corona new Strain in Maharashtra, Found patient In Amravati And yavatmal)

गेल्या आठवड्याभरापासून राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यांतल्या प्रमुख शहरांत तसंच ग्रामीण भागांत देखील कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेले काही दिवस प्रमुख मंत्र्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल प्रश्न विचारले जात होते. मात्र आता ही ठोस माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले डॉ. शशांक जोशी…??

“अमरावतीमध्ये चार रुग्णामध्ये एक E484k म्हणून स्ट्रेन आला आहे. स्पाईक प्रोटीनचा स्ट्रेन आहे. यू.के. आणि ब्राझीलच्या स्ट्रेनशी तो सिमीलर (मिळताजुळता) आहे. या स्ट्रेनची प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते किंवा तो अधिक वेगाने पसरतो. अमरावतीमधल्या 4 रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे.”

“अकोल रिजनमध्ये या स्ट्रेनचा जास्तीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि यवतमाळमध्ये एक N444 हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अजूनही आपल्या व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटने याबाबतची सविस्तर माहिती दिलेली नाहीय. पण या स्ट्रेनमधून होणारा कोव्हिड आणि नॉर्मल कोव्हिड यामध्ये जास्त फरक नसेल”, असं डॉ. शशांक जोशी म्हणाले.

“हा नवा स्ट्रेन अधिक वेगात फैलावू शकतो. त्यामुळे येत्या काळात शासनाला मिनी कन्टेन्मेट तसंच मायक्रो कन्टेन्मेट झोन करावे लागतील आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. त्याच अनुषंगाने अकोल्यात रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असंही डॉ. शशांक जोशी म्हणाले.

ऐका काय म्हणतायत डॉक्टर…?

(Corona new Strain in Maharashtra, Found patient In Amravati And yavatmal)

हे ही वाचा :

राज्यातील धडाडीच्या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना, दोन दिवसात 4 मंत्री पॉझिटिव्ह

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.