Coronavirus: धारावी, दादर, माहीममध्ये कोरोनाचा कहर, दिवसभरात 262 नवे रुग्ण सापडले
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धारावीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते.
मुंबई: मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धारावीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते. आता तिसऱ्या लाटेतही धारावी आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसत आहेत. आज धारावी आणि परिसरात 262 नवे कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
धारावीत आज कोरोनाचे 41 नवे रुग्ण सापडले आहेत. तर दादरमध्ये 91 आणि माहीममध्ये सर्वाधिक 130 रुग्ण आढळले आहेत. म्हणजे या तीन्ही भागात आज दिवसभरात 262 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.
कुठे किती आकडा वाढला?
धारावीत आज 41 नवे रुग्ण सापडल्याने धारावीतील रुग्णांची एकूण संख्या 7398 झाली आहे. तर दादरमध्ये 91 रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या 11036 वर गेली आहे. तर माहीममध्ये आज 130 नवे बाधित सापडल्याने येथील बाधितांची संख्या 11372 वर गेली आहे.
भिवंडीत 18 विद्यार्थ्यांना लागण
भिवंडीत चिंबीपाडा शासकीय आश्रमशाळेतील 14 मुली व 4 मुले अशा एकूण 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वसतिगृहात तब्बल 470 मुलं-मुली उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी करण्यासाठी चिंबी पाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक दाखल करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना घेऊन पालक पळाले
आश्रमशाळेतील सर्व 18 विद्यार्थ्यांना कोरोना लागण झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या पालकांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यानंतर या पालकांनी आपल्या 18 पाल्यांना घेऊन तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार सुरू असताना वैद्यकीय पथकाचे कर्मचारी मात्र पाहत राहिले. रुग्णवाहिकासोबत असूनही त्यांनी या पालकांचा पाठलाग न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पालिका आयुक्तांना कोरोनाची लागण
दरम्यान, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. शर्मा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. साधारण लक्षणे असल्याने त्यांनी टेस्ट केली होती. तेव्हा त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 3 January 2022https://t.co/nFEN1WEgD7#News | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 3, 2022
संबंधित बातम्या:
Breaking : मुंबई वगळता इतर विभागातील शाळा सुरुच राहणार, शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट
Corona Omicron News Live Update | कोरोनाचा कहर, मुंबईला धडकी, मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद
ठाण्यात दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहणार, शाळांबाबत नवी नियमावली काय? वाचा सविस्तर