Corona Vaccination live : कोरोना लसीकरणात राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
मुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सवांद साधत आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात झाली. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका मंजुषा येडांगे पहिल्या लाभार्थी ठरल्या आहेत. -
अहमदनगरमध्ये 12 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु
अहमदनगर जिल्ह्यात आज पासून कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. महानगर पालिका रुग्णालय 4 , ग्रामीण रुग्णालय 7 आणि जिल्हा रुग्णालय 1 अशा12 ठिकाणी लस दिली जाणार आहे. सुरुवातीला 1200 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. -
-
अदर पुनावालांनी Covishield लसीचा डोस घेतला
अदर पुनावाला यांनी कोरोना लस टोचून घेतली आहे. सीरमने कोविशिल्ड लस निर्माण केली आहे. कोव्हीशिल्डच्या आपत्कालीन लसीच्या वापराला केंद्र सरकारने मंजूरी दिलेली आहे.
I wish India & Sri @narendramodi ji great success in launching the world’s largest COVID vaccination roll-out. It brings me great pride that #COVISHIELD is part of this historic effort & to endorse it’s safety & efficacy, I join our health workers in taking the vaccine myself. pic.twitter.com/X7sNxjQBN6
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 16, 2021
-
नवी मुंबईत कोरोना लसीकरणाला सुरुवात, आरोग्य सेवक डॉ. विजय येवलेंना पहिला मान
नवी मुंबई महापालिकाच्या वतीने कोरोना लसीकरण सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्याला लस देण्यात आली.लसीकरणवेळी भाजप नेते संजीव नाईक ,माजी महापौर जयवंत सुतार हे उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका वाशी सार्वजनिक रुग्णालय,ऐरोली, डी वाय पाटील रुग्णालय ,अपोलो रुग्णालय येथे लसीकरण करण्यात येईल.
-
ठाणे जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात, जिल्हा शल्य चिकित्सकांना पहिली लस
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आज कोविडच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी पहिली लस घेतली..या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते.जिल्ह्यातील 23 केंद्रात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी याना लस दिली जाणार आहे.
-
-
रत्नागिरीमध्ये पाच केंद्रावर लसीकरणाला सुरुवात
रत्नागिरीमध्ये पाच केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सई धुरी यांनी जिल्ह्यातील पहिली लस टोचली. जिल्ह्यात ५०० कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. रत्नागिरीतल्या जिल्हा शासकीय रुग्णालय दोन, जिल्हा उप रुग्णालय आणि दोन ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्यात येत आहे.
-
पालघर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात
पालघर जिल्ह्यात जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांचे हस्ते कोरोना लसीकरणचे उद्धाटन करण्यात आले. जिल्ह्यात पहिली लस आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील यांना देण्यात आली.
-
लस कोणती द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेत असतं, शंका घेऊ नये: मुख्यमंत्री
लस कोणती द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेत असतं , पंतप्रधानांनी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केले. केंद्रानं निर्णयानं घेतल्यानं कोणतीही शंका घेऊ नये. पहिल्यांदा कोरोना योद्ध्यांना लस दिली जाईल. त्यानंतर इतरांना लस दिली जाईल. ज्या सूचना केंद्राकडून येतील त्याप्रमाणं काम होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मास्क घालणं विसरु नका, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.
-
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात
राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवातhttps://t.co/atVRNYeisi.#corona | #CoronaVaccine | #uddhavThackeray | #BMC pic.twitter.com/FlA49jskLc
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2021
-
इंदापूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ
इंदापूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला आहे. तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिली लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार असून आज दिवसभरात 100 जणांना लस दिली जाणार आहे.
-
आजचा दिवस हा अभिमानाचा आणि आनंदाचा: डॉ. संजय ओक
आजचा दिवस हा अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. आज जगामधील सर्वात मोठ्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.ते ही आपल्या देशात निर्माण केलेल्या दोन लसींच्या माध्यमातून ही सुरुवात केली आहे.शासकीय स्तरावर लसीकरणाचे चांगले आयोजन केले आहे, असं कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक यांनी म्हटलं
-
मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत इस्लामपूरमध्ये लसीकरण सुरु
सांगली: इस्लामपूर च्या उपजिल्हा रुग्णालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्या हस्ते लसीकरणास सुरुवात.
-
कल्याण डोंबिवलीत लसीकरण सुरु, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना पहिली लस
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोरोना लसीकणाच्या कार्यक्रमास आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून सुरुवात करण्यात आली. पहिली लस महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना देण्यात आली रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या डॉ. प्रज्ञा टिके यांच्यासह 100 जणांना आज लस देण्यात.येईल लसी घेणा:यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
-
वाशिममध्ये तीन केंद्रांवर कोरोना लसीकरणाला सुरवात
वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते आज जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.वाशिम जिल्ह्याला एकूण लसीचे 6 हजार 500 डोसेस उपलब्ध झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील 6 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून, आज प्रत्यक्षात जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम,100 उपजिल्हा रुग्णालय कारंजा, 100 ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर, 100आणि या तीन केंद्रावर आज लसीकरनत करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ अविनाश अहेर यांनी दिलीय.
-
परभणीत 4 केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात, दुर्गदास पांडे पहिली लस
परभणी जिल्ह्यात पहिल्या टप्यातील लसीकरण सुरू, दुर्गदास पांडे यांना जिल्हा रुग्णालयात नर्स राणी गायकवाड यांनी टोचली लस, जिल्ह्यात 4 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपा आरोग्य केंद्र, सेलू सामान्य रुग्णालय, आणि जांब आरोग्य केंद्र या 4 ठिकाणी लसीकरणास सुरुवात झालीय.एका केंद्रावर दर दिवशी 100 ,4 ठिकाणी एकूण दिवसभरात 400 लस देण्यात येणार आहे.
-
कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या मालेगावात 5 केंद्रावर कोरोना लसीकरणाला सुरुवात
कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या मालेगावात कोरोना लसीकरणाला सुरुवात, शहरातील 5 केंद्रावर कोरोना लसीकरणाला सुरुवात, प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थी देण्यात येणार कोरोनाची लस, मनपा आयुक्त दीपक कासार यांनी केले कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन
-
कोरोना लसीकरण हे क्रांतिकारक पाऊल, मुख्यमंत्र्यांचे उद्गार
कोरोना लसीकरण हे क्रांतिकारक पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व कोरोना योद्ध्यांना मानाचा मुजरा घालतो.
हेच ते ठिकाण… या ठिकाणी रुग्णांची संख्या प्रचंड होते. आपल्या कोविड योद्ध्यांनी काम चांगलं काम करतो. तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो, मानाचा मुजरा करतो.
ते दिवस आठवल्यावर अंगावर शहारे येतात, काहीच हाती नसताना आपण लढत होते. तुम्ही सर्व होते म्हणून शक्य, तुमच्यामुळे कोविड सेंटर ओस पडले आणि ते ओस पडलेले राहोत.
लस आली असली तरी सर्वात उत्तम लसही मास्क आहे. मास्क घालणं आवश्यक आहे.
-
सिंधुदुर्गमध्ये लसीकरणाला सुरुवात, कणकवलीत नितेश राणेंची उपस्थिती
सिंधुदुर्ग: कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात, आरोग्य कर्मचाऱ्याला पहिली लस देण्यात आली. लसीकरणाला आमदार नितेश राणे यांची उपस्थिती होती. सिंधुदुर्गात सामान्य रुग्णालय ओरोस, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे लसीकरण होणार आहे. प्रत्येकी केंद्रात 100 जणांना आज लस देण्यात येणार.एकूण जिल्ह्यात 300 जणांना आज लस देण्यात येणार आहे.
-
नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावं: राजेश टोपे
पंतप्रधानांनी लसीकरणाबद्दलचा मौलिक संदेश देशाला दिला. आरोग्यमंत्री म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांनी लसीकरण करावं, असं आवाहन करतो. कोरोना लसीकरणात सर्वांचाच नंबर लागेल, कुणीही काळजी करण्याची गरज नाही.
सर्वांना वाटतं की लस मिळावी, मात्र, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य माणसांचा क्रमांक आल्यावर लस घेणार, प्राधान्यक्रमानुसार जेव्हा लस मिळेल तेव्हा लस घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
लसीकरणाची गरज आहे, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. 8 लाख 50 हजार जणांची नोंदणी केली आहे. त्यामुळे 17 लाख 50 हजार डोस मिळणं गरजेचे आहे. राज्याला उर्वरित 7.5 लाख डोस मिळणं गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना त्याबाबत पत्र लिहीणार आहे.
-
उस्मानाबादमध्ये कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण, रांगोळीतून कोरोना निर्मूलनाचा संदेश
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. यासाठी रांगोळी काढून कोरोना निर्मूलनाचा सूचक इशारा दिला आहे. कोरोना लस सुरक्षित असून लसीच्या 2 डोसने कोरोना नष्ट होणार आहे, असा संदेश देत कोरोना रडताना रांगोळीच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे.
-
परभणीमध्ये तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाला सुरुवात
परभणी जिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्यातील लसीकरणची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण केलं जाणार आहे.
-
भारतातील कोरोना लसीकरणाचा पहिला डोस स्वच्छता कर्मचाऱ्याला
भारतातील लसीकरणाचा पहिला डोस स्वच्छता कर्मचाऱ्यांना
Delhi: A sanitation worker becomes the first person to receive COVID-19 vaccine jab at AIIMS. Union Health Minister Harsh Vardhan is also present. pic.twitter.com/iDIVIKqvEi
— ANI (@ANI) January 16, 2021
-
जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात डॉ. पद्मजा अजय सराफा यांना पहिली लस
जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात डॉ. पद्मजा अजय सराफा वैद्यकिय अधीकारी यांना जिल्ह्यात पहिली लस देण्यात आली.
-
नाशिकमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात, सफाई कर्मचारी मिलिंद पवार यांना पहिली लस
नाशिक – कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून लसीकरण मोहिमेला सुरुवात
जिल्हाधिकारी सूरज मांढरे , पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची उपस्थितीत
सफाई कर्मचारी मिलिंद पवार यांना दिली जिल्ह्यातील पहिली लस
-
भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात, जगातील सर्वात मोठं अभियान
भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवातhttps://t.co/C135z9u88l pic.twitter.com/qDCBD4cJDp
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2021
-
नागपुरात कोरोना लसीकरण सुरु, पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत सुरुवात
– नागपुरात कोरोना लसीकरण सुरु
– पाचपावली मनपा रुग्णालयात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून सुरुवात
– नागपूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर लसीकरण
– नागपूरात पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांवर लसीकरण झाले सुरु
– नागपुरात डागा, एम्स, मेडीकल, मेयो, पाचपावली मनपा रुग्णालयात लसीकरण सुरु
– ग्रामीणमध्ये रामटेक, कामठी, उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, गोंडखैरीत लसीकरण सुरु
– नागपूर जिल्ह्यातील लसीचे ४२ हजार डोजेस
– एक केंद्रावर रोज १०० जणांना लसीकरण
-
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण सुरु
कृष्णा अभिमत वैद्यकीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभरंभ
पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये तीन हजार लोकांची नोंदणी
-
चीनमध्ये अडकेलल्या भारतीयांना मायदेशी माघारी आणलं: पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपण 24 तास सतर्क होतो. प्रत्येक घडामोडीवर आपलं लक्ष होतं. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. भारतात 30 जानेवारी 2020 ला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र यानंतरच्या 2 आठवड्यांनी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला.
– वंदे भारत योजनेअंतर्गत 35 लाख भारतीयांना मायदेशात परत आणलं.
– केंद्र आणि राज्य सरकार, स्थानिक स्वराज संस्था यांनी एकत्र येऊन कसं काम करता येतं, याचं उदाहरण जगासमोर ठेवलं.
– इस्त्रो, डीआरडीओ, शेतकरी, कष्टकरी यांनी कोरोना काळात काम केले.
– देशातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे एकही रुग्ण दगावला नाही.
-150 देशांमध्ये हायड्रोक्सिक्लोरोक्वीन आणि इतर वैद्यकीय औषधं पोहोचवली.
– भारताचं लसीकरण अभियान पुढे जाईल, त्यानुसार जगातील इतर देशांना याचा लाभ होईल.
– लसीकरण अभियान दीर्घकाळ राहील, लोकांचे जीव वाचवण्याची संधी आपणाला मिळेल.
-लसीकरणासाठी स्वयंसेवक समोर येत आहेत. मास्क, दोन गज दूरी, आवश्यक राहील.
-दवाई भी, पढाई भी, हा नवा मंत्र, कोरोना लस निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करतो.
-कोरोनाचा प्रसार वाढत होता. चीन कोरोनाचं केंद्रस्थान होतं. विविध देशातील लोकं चीनमध्ये अडकले होते. विविध देशातील लोकांना त्यांच्या सरकारने त्यांना चीनमध्ये त्यांच्या जीवावर सोडून टाकलं. मात्र आपण चीनमधील आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या भारतात आणलं. तसंच फक्त भारतातीलच नाही तर इतर देशातील नागरिकांचीही आपण चीनमधून सुटका केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
-
काही क्षणानंतर भारतात जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु होतय: नरेंद्र मोदी
काही क्षणानंतर भारतात जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु होतय: नरेंद्र मोदी
– ज्याला कोरोना लशीची जास्त गरज त्याला प्राधान्याने कोरोना लस मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार उचलणार आहे.
– तुम्हाला पहिलं लसीकरण झाल्यानंतर दुसरा डोस कधी मिळणार याची माहिती तुमच्या फोनवर दिली जाणार आहे.
-देशातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस देण्यात येणार आहे. या कोरोना योद्धयांना देण्यात येणाऱ्या लशीचा खर्च हा केंद्र सरकार उचलणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
– कोरोना लसीचा दुसरा डोस घेणं गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये 1 महिन्याचं अंतर ठेवले जाईल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका.
– इतिहासातील सर्वात मोठ लसीकरण अभियान आहे. जगातील सर्वात मोठ लसीकरण अभियान आहे. जगात 100 देशांची संख्या 3 कोटींपेक्षा कमी, भारत 3 कोटी लोकांना लसीकरण करणार, दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लसीकरण करणार आहे.
– लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असं समजू नका. हलगर्जीपणा करु नका. मास्क घाला आणि आवश्यक शारिरक अंतर पाळा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
– वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही कोरोना लसीच्या गुणवत्तेबद्दल आश्वस्त झाल्यानंतर कोरोनालसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली. कोरोना लसीबाबतच्या अप्रचाराला बळी पडू नका.
-जगातील 60 टक्के लहान मुलांना जीवनरक्षक लसी दिल्या जातात त्या भारतात बनतात. जगाचा मेड इन इंडिया कोरोना वॅक्सिननमध्ये विश्वास वाढणार आहे. जगातील सर्वात कमी किमंत असणाऱ्या भारताच्या लसी आहेत.
– मास्क, पीपीई किट या वस्तू आयात कराव्या लागल्या, मात्र भारत सध्या त्या गोष्टींमध्ये आत्मनिर्भर झाला आहे.
-कोरोनाचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे. जेव्हा कोरोना भारतात पसरला तेव्हा भारतात एकच कोरोना तपासणी चाचणी केंद्र होतं. मात्र तेव्हा आपण सर्वांनी आपल्या डॉक्टरांवर विश्वास दाखवला. आजमितीस भारतात काही हजारोंच्या संख्येत कोरोना लॅब आहे. हे फक्त विश्वासामुळेच शक्य असल्याचं मोदींनी नमूद केलं.
– भारत लसीकरण मोहिम सुरु असताना कोरोना संकटाच्या काळातील दिवस आठवतात. या विषाणूनं आजारी व्यक्तीला कुटुंबापासून वेगळं केलं.
-आपल्याला वाचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, स्टाफ, नर्स, आशा वर्कर, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी मानवतेबद्दल असणाऱ्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. ते कुटुंबापासून दूर राहिले. अनेक दिवस ते घरी गेले नाहीत. काही कोरोना योद्धे माघारी घरी परतले नाहीत.
-कोरोना लसीचा डोस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना देऊन त्यांचे ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न, कोरोना सारख्या आव्हानाची कुणीचं कल्पना केली नव्हती.
– 30 जानेवारी 2020 कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला. पण त्यापूर्वी दोन आठवडे कोरोनावरील समिती बनवली होती. 17 जानेवारी 2020 ला भारतानं पहिल्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
– कोरोना विरुद्ध भारतीयांनी दिलेला लढा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत राहील. जनता कर्फ्यूनं देशाला लॉकडाऊनच्या मानसिकतेला तयार केलं.
-प्रत्येक भारतीयाचं जीवन वाचवण्यासाठी प्राथमिकता दिली. संपूर्ण देश या भावनेतून उभा राहिला. देशवासियांशी संवाद साधला. गरिबांना मोफत जेवण दिलं गेलं. आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.
-
भिवंडी शहरात पहिल्या टप्प्यात 2688 जणांना लसीकरण होणार
भिवंडी शहरात पहिल्या टप्प्यात शहरातील 2688 लाभार्थ्यांना लसीकरण होणार .आरोग्य विभागाशी निगडित कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांना या लसीकरणाचा लाभ पहिल्या फेरीत देणार .शहरात तीन केंद्र बनविण्यात आले असून महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते होणार शुभारंभभाग्यनागर , शाळा क्रमांक 75बाला कंपाऊंड ,शाळा क्रमांक 86चव्हाण कॉलनी शाळा क्रमांक 80 -
नागपूरमध्ये 12 केंद्रांवर लसीकरण, सात शहरी तर पाच ग्रामीण केंद्रांमध्ये तयारी
– नागपुरात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा
– नागपूर जिल्ह्यात 12 केंद्रांवर लसीकरण
– नागपूरात पाच तर ग्रामीण क्षेत्रातील सात केंद्रांवर लसीकरण
– नागपुरात डागा, एम्स, मेडीकल, मेयो, पाचपावली मनपा रुग्णालयात लसीकरण
– ग्रामीणमध्ये रामटेक, कामठी, उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर, गोंडखैरीत लसीकरण
– लसीकरणासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण
-
राज्यात 285 केंद्रांवर लसीकरण मोहिम, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
राज्यात 285 लसीकरण केंद्रावर लसीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 28 हजार 500 जणांना कोरोना लसीचा डोस देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
-
जालना जिल्ह्यात लसीकरणाची तयारी पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन होणार
आरोग्यमंत्री राजेश टोपेंची उपस्थिती
जालना : जिल्ह्यातील लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई आणि जालना इथं लसीकरण मोहिमेचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे. जालना जिल्ह्यासाठी 14 हजार 220 कोरोनाच्या लस प्राप्त झाल्या आहेत. कोविन अॅपवर 14 हजार आरोग्य कर्मचार्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 400 जणांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केलं जाणार आहे.
-
पुणे शहरातील 8 केंद्रांवस लसीकरण मोहीम
प्रत्येक केंद्रावर 100 कोरोनायोद्ध्यांना लस
पुणे : शहरातील कोरोना लसीकरण मोहिमेला सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात लसीकरण मोहिमेची सुरवात होईल. शहरातील एकूण 8 लसीकरण केंद्रांवर प्रत्येक 100 नोंदणीकृत कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे.
-
नागपूर जिल्ह्यात 12 केंद्रावर लसीकरण, प्रशासनाची तयारी पूर्ण
नागपुरात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात
नागपूर : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात एकूण 12 केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. नागपूर शहरात 5 तर ग्रामीण भागातील 7 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. नागपुरात डागा, एम्स, मेडिकल, मेयो, पाचपावली मनपा रुग्णालयात लसीकरण केलं जाणार आहे. तर ग्रामीण भागात रामटेक, कामठी, उमरेड, हिंगणा, काटोल, सावनेर आणि गोंडखैरी इथं लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. लसीकरणासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
Published On - Jan 16,2021 4:54 PM