आर्यनप्रकरणातही फर्जीवाडा उघड, वानखेडेंना निलंबित करा; नवाब मलिक यांची मागणी

| Updated on: Nov 20, 2021 | 6:49 PM

आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. म्हणजे हा फर्जीवाडा होता, हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

आर्यनप्रकरणातही फर्जीवाडा उघड, वानखेडेंना निलंबित करा; नवाब मलिक यांची मागणी
nawab malik
Follow us on

मुंबई: आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. म्हणजे हा फर्जीवाडा होता, हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, असं सांगतानाच हा फर्जीवाडा करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना निलंबित करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाडयावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असे मलिक यांनी सांगितलं.

तर या मागे भाजपचा हात होता हे उघड झाले

आता समीर दाऊद वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेईल. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे अशी उधळपट्टी थांबली पाहिजे, असे ते म्हणाले. समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आलीय केंद्रसरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करावे. आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे हे स्पष्ट होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोर्ट काय म्हणाले?

आर्यन खानच्या जामिनाची कोर्टाची ऑर्डर आली आहे. त्यात कोर्टाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवताना आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आर्यनच्या चॅटमध्ये कट कारस्थान असल्याचं आढलून येत नाही. आर्यन आणि अरबाज मर्चंट हे दोघेही स्वतंत्रपणे प्रवास करत होते. तसेच आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही. इतर आरोपींकडे ड्रग्ज सापडलं. पण त्याची मात्रा कमी होती, असं या ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. आर्यनचा गुन्हा करण्याचा हेतू होता, असा कोणताही पुरावा नसल्याचं निरीक्षण यात नोंदवलं आहे. त्याशिवाय या प्रकरणात एनसीबीने एनडीपीएसचं 29 कलम लावलं होतं. कट रचल्याबाबतचं हे कलम होतं. ते योग्यरित्या लावलं का हे आम्हाला तपासावं लागेल. तसेच या बाबतचे पुरावे आहेत का हे सुद्धा आम्हाला तपासावं लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या:

‘ते निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंदक्रांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

Bhavana Gawali : खासदार भावना गवळी यांना ईडीचं तिसरं समन्स, चौकशीला सामोरं जाणार का?

विधान परिषद निवडणुकीत चुरस की विजय सोपा?; कसं आहे मुंबईतील गणित