Mumbai Corona | अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत 20 टक्क्यांची वाढ, प्रशासनाची चिंता वाढली

मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले असून मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे

Mumbai Corona | अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत 20 टक्क्यांची वाढ, प्रशासनाची चिंता वाढली
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 6:06 PM

मुंबई : मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ (COVID-19 Cases Increases In Mumbai) होताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात शहर-उपनगरात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून येते आहे. शिवाय, मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येतही 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले असून मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे (COVID-19 Cases Increases In Mumbai).

मुंबईत कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 22 हजरांच्यावर

काही दिवसांपूर्वी 18 हजारांच्या घरात असलेले सक्रिय रुग्ण सध्या 22 हजारांपर्यंत पोहोचले आहेत. नुकताच पार पडलेला गणेशोत्सव आणि अनलॉकची सुरु झालेली प्रक्रिया हे पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत ठरत आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत स्थिरावलेली रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आणि राज्य शासनासमोर पुन्हा एकदा आव्हानाची स्थिती निर्माण झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णनोंद वाढत आहे. 4 सप्टेंबर रोजी 22 हजार 220 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापूर्वी, 3 सप्टेंबर रोजी 21 हजार 442, 2 सप्टेंबर रोजी 20 हजार 813 , 1 सप्टेंबर रोजी 20 हजार 65 आणि 31 ऑगस्ट रोजी ही संख्या 20 हजार 554 इतकी होती (COVID-19 Cases Increases In Mumbai).

शहर उपनगरात शुक्रवारी 1929, गुरुवारी 1526, बुधवारी 1622, मंगळारी 1142 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 3 ऑगस्ट रोजी मुंबईत अवघे 705 रुग्ण आढळले होते. परंतु, सप्टेंबरमध्ये ही संख्या हजारांच्या घरात पोहोचली आहे.

खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची संख्या वाढली आहे. शिवाय, अनलॉकमुळे प्रवास, वाहतूक वाढल्याने रुग्णसंख्येचा आलेख चढता दिसून येतो आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.

मुंबईत कोरोना टेस्ट वाढवण्याची गरज – भाजपा

“मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अनलॉक सुरु झालं आहे. पण नियोजन योग्य नाही, कोरोना टेस्ट मुंबईत वाढवण्याची गरज आहे. मात्र, पालिका ते करत नाही”, असं भाजपचे म्हणणं आहे.

COVID-19 Cases Increases In Mumbai

संबंधित बातम्या :

मुंबईकरांसमोर नवे संकट, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील अतिधोक्याच्या व्यक्तींमध्ये वाढ

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.