पंतप्रधानांना विरोध करणे हे अत्यंत चुकीचे; ‘या’ मंत्र्याने विरोधकांना त्यांची चूक त्यांना दाखवून दिली

उद्धव ठाकरे हे शरद पवारांचा सल्ला ऐकतात की आंबेडकरांचा सल्ला ऐकतात हे पाहू अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या सल्ल्याला माझा पाठिंबा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांना विरोध करणे हे अत्यंत चुकीचे;  'या' मंत्र्याने विरोधकांना त्यांची चूक त्यांना दाखवून दिली
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 10:18 PM

मुंबई : देशाच्या नव्या संसद भवनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. तर दुसरीकडे विरोधकांसह 19 पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यावर बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेचे उद्घाटन होणार असा निर्णय झाला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोधकांनी विरोध करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

तर दुसरीकडे विरोधकांनी आता नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोट बांधण्यासाठी देशातील अनेक दिग्गज नेते आता एकमेकांना भेटत आहेत.

त्यावरून रामदास आठवले यांनी सांगितले की, नितिश कुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना भेटले असतील तसेच केजरीवालही भेटले असतील मात्र या भेटीमुळे नरेंद्र मोदी यांच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच जिंकणार आहेत आणि त्यांना हरवणे हे सध्या सोपे नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री रामदास आठवले यांनी बोलताना प्रकाश आंबेडकर यांच्याविषयीही बोलताना सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला सल्ला चांगला आहे.

त्यांनी ठाकरेंसोबत दोस्ती केली होती आता त्यांची दोस्ती आहे की नाही मला माहित नाही असा टोलाही रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना म्हटले आहे की, त्यांनी दिलेला सल्ला मान्य करायला हरकत नाही असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे शरद पवारांचा सल्ला ऐकतात की आंबेडकरांचा सल्ला ऐकतात हे पाहू अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या सल्ल्याला माझा पाठिंबा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच त्यांनी हेही सांगितले की, शिवशक्ती (ठाकरे) भीमशक्ती (आंबेडकर) एकत्र आली की नाही हे मला माहिती नाही मात्र बाळासाहेब ठाकरे आणि मी एकत्र आलो तेव्हा शिवशक्ती भीम शक्ती एकत्र आली होती असा त्यांनी यावेळी इतिहासही त्यांनी सांगितला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.