मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून यात्रा आणि जत्रा बंद आहेत. त्यामुळे यात्रा-जत्रेतून रोजगार मिळवणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्यावर राज्यातील यात्रा आणि जत्रांना परवानगी दिली जाईल, असं आश्वासन अमित देशमुख यांनी दिलं आहे. (cultural minister amit deshmukh met tamasha artist in mantralaya)
अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी अखिल भारतीय मराठी तमाश परिषदेच्या उपाध्यक्षा मंगला बनसोडे, सचिव शेषराव गोपाळ, उपसचिव मोहीत नारायणगांवकर, खजिनदार किरण ढवळपूरीकर, संचालक राजेश सांगवीकर, संचालक अविष्कार मुळे, संचालक मुसा इनामदार हजर होते. यावेळी देशमुख यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोविड पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या दीड वर्षापासून सांस्कृति कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे. कोविडचा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असल्याने हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात आर्थिक सहाय्य देणे तसेच तमाशा फडाना मदत करणे यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. कोविड विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी गेल्या काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील पूर्णवेळ तमाशा फड आणि हंगामी तमाशा फडांना प्रतिवर्षी शासनाकडून अनुदान मिळावे, राज्यातील तमाशा फडांना एक तासांचा अधिक वेळ वाढवून मिळावा, गाव- यात्रा चालू करुन तमाशा फडांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी अशा काही मागण्या असलेले निवेदन यावेळी उपस्थितांनी देशमुख यांना दिले. (cultural minister amit deshmukh met tamasha artist in mantralaya)
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 26 July 2021 https://t.co/f9lqxn4AoF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 26, 2021
संबंधित बातम्या:
अखेर राज्य सरकार सीबीआयला आवश्यक कागदपत्रे देण्यास तयार, अनिल देशमुखांना धक्का बसणार?
भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही; नवाब मलिकांनी सुनावले
(cultural minister amit deshmukh met tamasha artist in mantralaya)