Cyclone Biparjoy : ‘बिपरजॉय’ नाव कसे पडले? कोणी दिले चक्रीवादळाला नाव
Cyclone Biparjoy in mumbai : मुंबईजवळ आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबई अन् कोकण किनारपट्टीवर दिसू लागला आहे. मुंबई, कोकणात समुद्राच्या अंतरंगात बदल झाला आहे. ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळाचे नाव कसे पडले? जाणून घेऊ या
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र झाले आहे. रविवारपासून चक्रीवादळाचे परिणाम दिसून येत आहे. १५ जून रोजी या चक्रीवादळामुळे गुजरात आणि कराचीमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी घडत असताना सध्या एकच चर्चा रंगली ती म्हणजे या वादळाच्या नावांची…या चक्रीवादळाला नाव कसे पडले? चक्रीवादळांची नावे कोण ठरवतो? हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही.
कशी देतात नावे
वादळांची नावे कशी आणि कोणाकडून दिली जातात. विशेष म्हणजे दरवेळी येणाऱ्या वादळांची नावे हटकी आणि वेगळी असतात. ही नावे देण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे. हवामान खात्याने (IMD) आतापर्यंत अनेक वादळांची नावे जाहीर केली आहेत. या नावांना जागतिक मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट (WMO) पॅनेलने मान्यता दिली आहे. या यादीनुसारच येणाऱ्या वादळांचे नाव ठरवण्यात येते.
बिपरजॉय काय आहे?
अरब महासागरात ६ जून रोजी चक्रीवादळ आले. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आले. बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे. त्याचा अर्थ संकट होते. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले.
नामकरणाची सुरुवात कशी झाली
१९५० पर्यंत चक्रीवादळाला नावे दिली जात नव्हती. अटलांटिक प्रदेशातील चक्रीवादळांचे नाव १९५३ पासून देण्यास सुरुवात झाली. तर हिंदी महासागर क्षेत्रातील आठ देशांनी या वादळांना नाव देण्याची पद्धत 2004 साली सुरू केली. या आठ देशांमध्ये भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यानंतर 2018 मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि येमेन देखील त्यात सामील झाले. जर वादळ येण्याची शक्यता असेल तर या 13 देशांना अनुक्रमाने 13 नावे द्यावी लागतील.
दोन प्रकारची नावे
वादळांच्या नावासाठी देखील सम-विषम सूत्र वापरला जातो. 2002, 2008, 2014 सारख्या वर्षांमध्येही चक्री वादळ आले तर त्याला पुलिंग नाव दिले जाते. दुसरीकडे, 2003, 2005, 2007 सारख्या विषम वर्षांमध्ये चक्रीवादळ आले तर त्याला स्त्रिलिंग नाव दिले जाते. एखादे नाव सहा वर्षांच्या आत पुन्हा वापरले जात नाही, तसेच ज्या वादळाने खूप विध्वंस केला असेल तर त्याचे नाव कायमचे काढून टाकले जाते.
यंदा बांगलादेशने दिले नाव
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, म्यानमार, ओमान आणि मालदीव यांनी वादळांच्या नावांची यादी जागतिक हवामान संघटनेला दिली आहे. या देशांमध्ये कुठेतरी वादळ आले की त्या नावांवरून एक नाव निवडले जाते. यावेळी नाव ठेवण्याची पाळी बांगलादेशची असल्याने बांगलादेशने ‘बिपरजॉय’ असे नाव दिले. ही यादी पुढील 25 वर्षांसाठी तयार करण्यात आली आहे. 25 वर्षांपासून बनवलेली ही यादी तयार करताना दरवर्षी किमान पाच चक्रीवादळे होतील असे गृहीत धरले आहे.