मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराची उद्या भव्य रथमात्रा, ‘या’ मार्गातून नगरप्रदक्षिणा

राज्यभरात सध्या माघी गणेशोत्सवाचा उत्साह (Maghi Ganesh Utsav) आहे. या उत्साहादरम्यान मुंबईतून (Mumbai) एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराची उद्या भव्य रथमात्रा, ‘या’ मार्गातून नगरप्रदक्षिणा
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 9:07 PM

नंदकिशोर गावडे, Tv9 मराठी, मुंबई : राज्यभरात सध्या माघी गणेशोत्सवाचा उत्साह (Maghi Ganesh Utsav) आहे. या उत्साहादरम्यान मुंबईतून (Mumbai) एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. मुंबईत दादर येथे प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak Temple) मंदिर आहे. या गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा केला जातोय. गणपती मंदिराच्या न्यास व्यवस्थापन समितीकडून महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. गणपती मंदिराकडून उद्या मुंबईत भव्य रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या रथयात्रेत हजारो भाविकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे भाविकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तसेच मुंबईत काही कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी देखील ही महत्त्वाची बातमी आहे.

“दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव 22 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येतोय. येत्या बुधवारी म्हणजेच उद्या 25 जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता श्रीसिद्धिविनायकाची रथयात्रा गणपती मंदिरातून निघणार आहे”, असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

ही रथयात्रा श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर येथून एस. केत. बोले मार्ग, त्यानंतर पुढे गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग-काशीनाथ घाणेकर मार्ग, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी मंदिर, वीर सावरकर मार्ग अशी फिरुन परत सिद्धिविनायक गणपती मंदिरात पोहोचेल.

“या रथयात्रेत भाविकांना हजारोंच्या संख्येत सहभागी होऊन रथयात्रा नगरप्रदक्षिणा सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे”, असे न्यास व्यवस्थापन समितीने आवाहन केलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.