Dahihandi 2022: दहीहंडीसाठी दादरमध्ये आज रस्त्यांवर निर्बंध, ‘हे’ मार्ग असतील बंद

यंदा मोठ्यासंख्येने आणि उत्साहाने दहीहंडी सण साजरा होणार आहे. या उत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या मार्गांवर निर्बंध घालण्यात आलेले आहे. दादरमध्ये काही मार्ग बंद करण्यात आलेले आहे. जाणून घेऊया कुठकुठले मार्ग आज बंद राहतील. 

Dahihandi 2022: दहीहंडीसाठी दादरमध्ये आज रस्त्यांवर निर्बंध, 'हे' मार्ग असतील बंद
दहीहंडी मुंबई Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 8:11 AM

मुंबई, दहीहंडी (Dahihandi 2022) उत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी मध्य मुंबईत आज वाहनांसाठी रस्त्यावरील निर्बंध जाहीर केले आहेत. गुरुवारी पोलिसांच्या पथकांनी रानडे रोडसह दादरमधील (Dadar road Close today) काही रस्त्यांवर बेकायदेशीरपणे पार्क केलेली वाहने उचलली. यंदा सर्व निर्बंधमुक्त दहीहंडीचा उत्सव पार पडणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे दहीहंडी उत्सवाला परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा मोठ्यासंख्येने आणि उत्साहाने दहीहंडी सण साजरा होणार आहे. या उत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या मार्गांवर निर्बंध घालण्यात आलेले आहे. दादरमध्ये काही मार्ग बंद करण्यात आलेले आहे. जाणून घेऊया कुठकुठले मार्ग आज बंद राहतील.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील

  1.  पनेरी जंक्शन ते दादर पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंत रानडे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील.
  2. डा सिल्वा रोड विसावा रेस्टॉरंट ते दादर पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील.
  3.  कबुतरखाना ते दादर पश्चिम रेल्वे स्थानकापर्यंत एमसी जावळे रोड वाहतुकीसाठी बंद राहील.
  4.  नवीन प्रभादेवी रोड धनमिल नाका ते अप्पासाहेब मराठे रोड वाहतुकीसाठी बंद राहील.
  5. हे सुद्धा वाचा
  6.  राजाभाऊ देसाई मार्ग  प्रभादेवी नाका ते आप्पासाहेब मराठे रोड वाहतुकीसाठी बंद राहील.

त्यामुळे नागरिकांनी गैरसीय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

राज्यात सुरु होणार ‘प्रो-दही-हंडी’ स्पर्धा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल 18 ऑगस्ट रोजी  ‘दही-हंडी’ हा आता राज्यात अधिकृत खेळ म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा केली आहे. राज्यात ‘प्रो-दही-हंडी’ स्पर्धा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जन्माष्टमीनिमित्त बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रातील क्रीडा प्रकारांतर्गत ‘दही-हंडी’ला मान्यता मिळणार आहे. ‘प्रो-दही-हंडी’ सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय ‘गोविंदांना’ क्रीडा प्रकारांतर्गत नोकऱ्या देखील मिळणार आहेत. तसेच सर्व गोविंदांसाठी ₹10 लाखांचे विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.