Heavy Rains In Konkan: कोकणाला अती मुसळधार पावसाचा धोका; मुंबई, पालघर, रायगड, चिपळूण, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट
मुंबईसह पालघर, रायगड, चिपळूण, रत्नागिरीत धो धो पाऊस पडत आहे. हवामान ख्यात्याकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे. सर्व ठिकाणी आत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

मुंबई : बुधवार पासून सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात धो धो पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून कोकणाला अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे(Heavy Rains In Konkan). मुंबई(Mumbai), पालघर(Palghar), रायगड(Raidgad), चिपळूण(Chipuln), रत्नागिरीला(Ratnagiri) ऑरेंज अलर्ट(Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह पालघर, रायगड, चिपळूण, रत्नागिरीत धो धो पाऊस पडत आहे. हवामान ख्यात्याकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे. सर्व ठिकाणी आत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
मुंबईत धो धो पाऊस
गुरुवार पासून मुंबईत धो धो पाऊस पडत आहे. शुक्रवारीही पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे मुंबईत दादर, लोअर परेल सह अनेक ठिकाणी पाणी सखल पाणी साचले होते. तर रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल विलंबाने धावत आहेत. अंधेरी भुयारी मार्गाला पुन्हा पावसाचे पाणी तुंबले होते. त्यानंतर काही काळ तो बंद करण्यात आला होता. मात्र, पाणी ओसरल्यानंतर अंधेरी भुयारी मार्ग पुन्हा खुला करण्यात आला आहे.
पालघरमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन
पालघर मध्ये उद्या पहाटे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर कोसबाड हवामान केंद्राने हा अंदाज वर्तवला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय शेतकरी आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पालघरमध्ये 110 मीमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा धुमाकूळ
चिपळूण मधे पहिल्याच पावसाने धुमाकूळ घातला आहे. पवसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण नजीक कामथे घाटात पावसामुळे रस्ता खचला आहे. महामार्ग लागत साईडपट्टी खचत आहे. माती महामार्गावर येत आहे. जेसीबी मशीन आणि कामगार यांच्या माध्यमातून घाटात काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे. रत्नागिरी शहरासह आजपासच्या परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आहे.