Video | Tv9 Special Report : देवेंद्र फडणवीसांच्या टार्गेटवर ‘शरद पवार’; आव्हाडांचा पलटवार
मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनीच केला. आतापर्यंत दोन समाजाला झुंझवत ठेवलं, असा आरोप फडणवीसांनी पवारांवर केलाय. फडणवीसांच्या मेळाव्यातून भाष णाचा रोग पहिला तर तो विशेषतः शरद पवार यांच्याकडे आहे त्यामुळे यापुढे सुद्धा फडणवीसांच्या निशाण्यावर पवारच अधिक वेळ असतील असं दिसतं.
मुंबई : भाजपच्या नागपुरातल्या मेळाव्यातून फडणवीसांनी शरद पवारांना टार्गेट केलंय. शरद पवारांमुळेच मराठा आरक्षण लांबलं. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांनीच केला, असा आरोप फडणवीसांनी केलाय. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी लोकं झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपदी आणि म्हणून झुंझवत ठेवायचं भाजपच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या टार्गेवर आलेत शरद पवार.
पाहा व्हिडीओ:-
शरद पवार आणि ठाकरे गटावर हल्लाबोल करतानाच मराठा आरक्षणासाठीसरकारचे सर्वप्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्याचवेळी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, हेही फडणवीसांनी सांगितलं. तर फडणवीस, ओबीसीमधूनच आरक्षण देणार असल्याचं जरांगे म्हणतायत. जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंत, सरकारला मुदत दिलीय. त्यामुळं सरसकट आरक्षणाचं लिखीत आश्वासन पूर्ण करा. नाही तर आम्हीही जरांगेंसोबत आंदोलनाला बसणार, असा इशारा सरकारमधलेच आमदार बच्चू कडूंनी दिलाय.
भाजपच्या मेळाव्यातून फडणवीसांनी शरद पवार आणि ठाकरे गटावर निशाणा साधतानाच आगामी निवडणुकीवर देखील भाष्य केलं. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत एकत्र लढणार असून तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा लढणार. असं सांगताना जागा वाटपात मोठा भाऊ भाजपचं. हेच फडणवीसांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. दोन्हीही निवडणूक तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत.
आपल्याला किती जागा मिळतील? त्यांना किती जागा मिळतील? काळजी करू नका. एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत. त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार आहे. मी यानिमित्ताने एक सांगू इच्छितो की हे जे काही तीन पक्ष तिकडे एकत्रित आहेत काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये बघा की सुधीर भाऊंनी सांगितलंय खरं आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा फडणवीसांच्या मेळाव्यातून भाषणाचा रोग पहिला तर तो विशेषतः शरद पवार यांच्याकडे आहे त्यामुळे यापुढे सुद्धा फडणवीसांच्या निशाण्यावर पवारच अधिक वेळ असतील असं दिसतं.