दादर रेल्वेस्थानकावर आलेल्या ‘नंदिग्राम’च्या टॉयलेटमध्ये डेडबॉडी… मृतदेह पाहताच प्रवाशांची वळली बोबडी; नेमकं काय घडलं?
दादर रेल्वे स्थानकावर आलेल्या नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दादर लोहमार्ग पोलिसांकडून या प्रकरणी तपासाला सुरुवात झाली आहे. मृतकाने शौचालयात गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची माहिती समोर येत आहे.
दादर रेल्वे स्थानकावर आलेल्या नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये मृतदेह आढळला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली आहे. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात 50 वर्षीय इसमाने गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये सुद्धा खळबळ उडाली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर काही काळ पळापळ सुरु झाली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेहाला बाहेर काढत रुग्णालयात नेलं. मृतक व्यक्तीने असं एक्सप्रेसच्या शौचालयात जीवन का संपवलं? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
मृतक व्यक्ती हा मूळचा घाटकोपर परिसरात वास्तव्यास होता. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. त्याच्यावर काही दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. संबंधित प्रकरणात तो फरार होता. मृतकाने याच गुन्हा प्रकरणामुळे मानसिक त्रासामध्ये स्वत:चं आयुष्य संपवल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीने नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये गळ्यातील गमछाने गळफास घेतला. या प्रकरणी दादर लोहमार्ग पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी बॅगमध्ये आढळलेला मृतदेह
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच दादर रेल्वे स्थानकावर एका बॅगमध्ये मृतदेह आढळला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. आरोपी हे मृतदेह कुठल्यातरी रेल्वे गाडीत टाकणार होते. पण त्यात त्यांना अपयश आलं. यानंतर ते तुतारी एक्सप्रेसने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण पोलिसांना संशय आला. पोलिसांनी आरोपींना पकडलं. यानंतर सर्व प्रकार समोर आला. आरोपींनी कलिना परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची हत्या केली. त्यानंतर ते मृतदेहाची व्हिलेव्हाट लावण्यासाठी दादर रेल्वे स्थानकावर आले होते.