राजकीय घडामोडींना वेग; सागर बंगल्यावर बैठक, मुख्यमंत्री पुन्हा दिल्ली वारीवर…

देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील आमदार, खासदार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर बैठक झाली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

राजकीय घडामोडींना वेग; सागर बंगल्यावर बैठक, मुख्यमंत्री पुन्हा दिल्ली वारीवर...
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 11:18 PM

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी आणि आरोप-प्रत्यारोपांना राजकारण ढवळून निघाले असतानाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ही बैठक जवळपास दोन तास चालली होती, त्यामुळे सागर बंगल्यावर नेमकी काय खलबतं झाली आहेत याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीचे राजकीय वर्तुळातून अनेक अर्थ काढले जात आहेत. कारण दोनच दिवसापूर्वा भाजपचे आमदार आशिष शेलार वर्षा बंगल्यावर हातात कागद घेऊन हजर झाले होते. त्यानंतर आज लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर बैठक झाल्याने आणि मुंबईतील आमदार-खासदार यांची उपस्थिती असल्याने या बैठकीची जोरदार चर्चा करण्यात येत आहे.

या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवली गेली असल्याची चर्चाही केली जात आहे. या बैठकीला प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, भारती लव्हेकर, आणि आशिष शेलार हेही या बैठकीला उपस्थित असल्याने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिल्ली वारीवर आहेत. एकनाथ शिंदे उद्या एकनाथ शिंदे यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असू यावेळी मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भातही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील आमदार, खासदार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर बैठक झाली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, तसेच राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होणार की निर्णय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.