रक्ततुला करणाऱ्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घ्यावी; मेळघाटात कुपोषणमुळे आदिवासांना रक्त दान करणार; फडणवीसांना कुठे विरोध, कुठे समर्थन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना नागपूर महानगरपालिकेनं 'रक्ततुले'ची शक्कल लढविली. त्यावेळी पालिकेच्या सिव्हील लाइन्स भागातील मुख्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं. त्याविषयी आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वजना इतकं रक्तदान करण्यात आले.
मुंबईः राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत आणि राहतात. कालच झालेल्या भाजपच्या मेळाव्या मुंबई महानगरपालिकेवर भाजप-शिंदे गटाच्या शिवसेनेचीच दहीहंडी फोडणार असा ठाम निर्धार केल्यानंतरही राजकीय चर्चेना उधाण आले होते. आता नागपूर महानगरपालिकने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारप्रसंगी राजकारण्यांचा हार-तुरे, शाल-श्रीफळ देत सत्कार करण्याच्या प्रथेला छेद देत नागपूर महानगरपालिकेनं शुक्रवारी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रक्ततुला’ (Raktstula) करण्यात आली, आणि तेही कुठल्याही तराजूत न बसवता, मात्र या उपक्रमाचे एकीकडे कौतूक केले जात आहे तर दुसरीकडे टीकाही करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रक्ततुलावर आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत असली तरी त्याबाबतचा हेतू चांगला असला तरी रक्तदान केलेले रक्त खराब होणार नाही याचीही दक्षता घेणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
नागपूर महानगरपालिकची ‘रक्ततुले’ची शक्कल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना नागपूर महानगरपालिकेनं ‘रक्ततुले’ची शक्कल लढविली. त्यावेळी पालिकेच्या सिव्हील लाइन्स भागातील मुख्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं. त्याविषयी आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या वजना इतकं रक्तदान करण्यात आले. यामध्ये, महापालिकेच्या एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज रक्तदान करत स्वागत करुन समारंभाचा नवा पायंडा पाडला आहे. हे रक्त महापालिकेच्या ब्लड बँकेत जमा करण्यात येणार आहे. असल्याचेही सांगण्यात आले मात्र अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे.
महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अस्थिर
आमच्या अमरावती जिल्ह्यात येवढ्या दिवसानंतर काल कृषीमंत्री आले होते, मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, या संकटात शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याचे मत आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितले. तसेच रक्ततुला करणाऱ्यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी होती असंही त्यांनी यावेळी सांगितले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना तात्काळ मदत करायचे, म्हणजे दौरा सुरु असताना त्याच वेळेस अधिकारी मदत वाटप करायचे असंही त्यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रातील राजकीय स्थिती अस्थिर केली आहे आणि शेतकऱ्यांना मदतही करत नाहीत अशी जोरदार टीका त्यांच्यावर करण्यात आली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचाही मुद्दा सभागृहात लावून धरणार असल्याचे सांगितले.
हा काही राजकीय इव्हेंट नाही
तर खासदार नवनीत राणार यांनी देवेंद्र फडणीवस यांच्या रक्ततुलाविषयी खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, दहीहंडी आणि रक्ततुला हा काही राजकीय इव्हेंट नाही. मेळघाटात कुपोषण आहे, त्यामुळे तिथल्या आदिवासींना हे रक्त दान करण्यात येणार आहे. मेळघाटात रक्ताची गरज आहे, त्यामुळे फडणवीस यांची रक्ततुलाचं आयोजन आयोजन केले होते, असंही त्यांनी यावेळी सांगितले. प्रोटोकॅालमध्ये बसत नही, म्हणून फडणवीस यांच्या वजनाइतकं रक्त गोळा करुन दान करण्यात येणार आहे. या मुख्य गोष्टीकडे लोकं दुर्लक्ष करतात असंही त्यांनी यावेळी सांगितेल.प्रोटोकॅालमध्ये बसत नाही तरीही फडणवीसयांची रक्ततुला करणार नाही मात्र फडणवीस यांच्या वजनाइतकं रक्तदान करणार असल्याचे सांगत ही रक्ततुला राजकारण्यासाठी नाही, तर बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना इथली समस्या काय कळणार नाही तसेच सामाजिकता म्हणून आज दहीहंडी आणि रक्तदान कार्यक्रम घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
…हे मोठं दान
याविषयी आमदार रोहित पवार यांनी बोलतान सांगितले की, रक्तदान असेल, अन्नदान असेल, हे मोठं दान आहे. चांगल्या हेतूतून रक्ततुला करत असेल तर त्यात गैर नाही असं मत त्यांनी व्यक्त केले. तसेच लोकांकडून घेतलेले रक्त वाया जाणार नाही, याची काळजी संबंधीत संस्थेनं घेतली पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे मोठे नेते असल्याचे सांगत त्यांनी मेळघाटच्या कुपोषणाचे आकडे बघितले तर ते सुधारले नाहीत, त्यावेळी त्यांचं सरकार पाच वर्षे होतं, तेव्हाही ते सुधारले नाही अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. यावेळी दुष्काळाविषयी सांगताना ते म्हणाले की, ओला दुष्काळ आहे, तिथे फार वाईट स्थिती आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सत्ता स्थापन होत असल्यामुळे गरजेच्या वेळेस मदत मिळाली नाही. अजूनंही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे भाजपने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.