सकाळी निर्णय, संध्याकाळी जीआर; कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अजितदादांची झटपट अॅक्शन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहा:कार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. (Deputy CM Ajit Pawar hold Corona, Mucormycosis Review Meeting in mumbai)
मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहा:कार आणि तिसऱ्या लाटेची शक्यता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय अजित पवारांनी आज सकाळी घेतला. केवळ निर्णय घेऊन ते थांबले नाहीत, तर संध्याकाळी त्याचा जीआरही काढला. त्यामुळे निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळही मिळालं आहे. (Deputy CM Ajit Pawar hold Corona, Mucormycosis Review Meeting in mumbai)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या परिस्थितीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा गौण खनिज विकास निधीतून आरोग्यासाठी 30 टक्के निधी खर्च करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही तासातच यासंबंधीचा आदेश जारी झाला आहे. यामुळे कोरोनासह म्युकर मायकोसिसविरुद्धच्या लढ्याला बळ मिळाले आहे.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम होणार
पंधराव्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात आरोग्यसुविधा उभारता येणार आहेत. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम होणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी ग्रामपातळीवर किमान 30 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. जिल्हा गौण खनिज विकासनिधीतून आरोग्यासाठी 30 टक्के निधी खर्च करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना आज तात्काळ देण्यात आले आहेत.
3 हजार 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 30 टक्के रक्कम आरोग्य विषयासाठी खर्च करण्यास याआधीच मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरासाठी 3 हजार 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील 1 हजार 100 कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी एक कोटी रुपये कोविड प्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामाध्यमातून विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण 350 आमदारांचा 350 कोटी रुपयांचा निधी कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यापूर्वीच उपलब्ध झाला आहे.(Deputy CM Ajit Pawar hold Corona, Mucormycosis Review Meeting in mumbai)
Mahafast | दहावीच्या परीक्षासंदर्भात राज्य सरकार लवकरच जीआर काढणारhttps://t.co/SWTWietG92#Mafast | #Corona | #Mahafastnews | #SSC
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
संबंधित बातम्या:
अजित पवार इन अॅक्शन; रुग्णालयांच्या फायर ऑडिटपासून म्युकोरमायकोसिस औषधांबाबत बैठकीत आढावा
(Deputy CM Ajit Pawar hold Corona, Mucormycosis Review Meeting in mumbai)