उल्हासनगरच्या पोलीस उपायुक्तांचं ‘मिशन ऑल आऊट’; 4 तासात तब्बल 23 गुन्हे दाखल, 22 जणांना ठोकल्या बेड्या

ऑपरेशन ऑल आऊट या मोहिम राबवल्याबद्दल आणि गुन्हेगारी (Crime) कमी करण्याचा जो प्रयत्न करण्यात आला आहे, त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या कौतुक होत आहे.

उल्हासनगरच्या पोलीस उपायुक्तांचं 'मिशन ऑल आऊट'; 4 तासात तब्बल 23 गुन्हे दाखल, 22 जणांना ठोकल्या बेड्या
उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; 22जणांना ठोकल्या बेड्या
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 9:11 PM

अंबरनाथ: उल्हासनगर (Ulhasnagar) पोलीस उपायुक्तांनी (Deputy Commissioner of Police) परिमंडळ 4 मध्ये गुरुवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल आऊट’ (Operation All Out) राबवलं. यामध्ये अवघ्या 4 तासात तब्बल 23 गुन्हे दाखल करुन याप्रकरणात 22 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ऑपरेशन ऑल आऊट या मोहिम राबवल्याबद्दल आणि गुन्हेगारी (Crime) कमी करण्याचा जो प्रयत्न करण्यात आला आहे, त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या कौतुक होत आहे. परिसरात वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते, त्यामुळे महिला, मुली आणि परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

शहर भागात मोठ्या प्रमाणआत गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ चारचे उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी 31 मार्च रोजी ‘मिशन ऑल आऊट’ राबवले गेले. यामध्ये 31 मार्च रोजी रात्री 8 ते 12 अशा 4 तासात पोलिसांनी अवैध धंदे, गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

आठ पोलीस ठाण्यात एकाच वेळी कारवाई

परिमंडळ चारमधील उल्हासनगर, मध्यवर्ती, विठ्ठलवाडी, हिललाईन, अंबरनाथ, शिवाजीनगर, बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम अशा 8 पोलीस ठाण्यांमध्ये एकाच वेळी ही कारवाई सुरू करण्यात आली.

कारवाईचा धडाका; 23 गुन्हे दाखल

या ठिकाणी आठ पोलीस स्थानकात 4 तासात 23 गुन्हे दाखल करण्यात आले,आणि त्यासंदर्भात त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईत अवैध दारू विक्रीचे सर्वाधिक 16 गुन्हे दाखल करण्यात आले. तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधात 4, अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर 1, उशिरापर्यंत बार सुरू ठेवल्याबद्दल 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय 2 वॉन्टेड गुन्हेगारांसह 2 तडीपार गुंडांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.

गुन्हेगारांवर पोलिसांची जरब

या कारवाईत स्वतः उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्यासह सहायक पोलीस उपायुक्त मोतीचंद राठोड, एसीपी जगदीश सातव, 8 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 52 अधिकारी आणि 307 कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर पोलिसांची जरब बसून गुन्हेगारी कारवाया कमी होण्यास मदत होणार आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्यांमधून पोलिसांचं कौतुक होतंय.

संबंधित बातम्या

वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीच्या मृत्यूनंतर जावई, नातवांचाही हक्क! दिल्ली कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Delhi Atm robbery : दिल्लीत ATM फुटेना म्हणून चक्क उपसूनच नेलं, किती लाखाला लुटले?

सिंधुदुर्गात बैलांची झुंज प्रकरणी 12 जणांवर गुन्हा; मुंबईच्या माजी महापौरांचा समावेश; ‘पाल’ संस्थेने केली तक्रार

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.