Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय की हा लॉकडाऊनचा परिणाम ?, पाहा मुंबईतील आकडेवारी काय सांगते

मुंबईतील सध्याच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार नव्या गोष्टी समोर येत आहेत. मुंबईत 25 एप्रिल रोजी एकूण 5542 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. (mumbai latest corona update)

कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय की हा लॉकडाऊनचा परिणाम ?, पाहा मुंबईतील आकडेवारी काय सांगते
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 12:10 AM

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईमध्ये (Mumbai latest Corona update) तर ही परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. मात्र मुंबईतील सध्याच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार नव्या गोष्टी समोर येत आहेत. मुंबईत 25 एप्रिल रोजी एकूण 5542 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आकडेवारी एप्रिल महिन्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णंख्येमधील सर्वांत कमी आहे. याच कारणामुळे सध्या मुंबईत कोरोनाचा प्रसार मंदावला असून हळूहळू रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे का ?, असे विचारले जाऊ लागले आहे. शनिवारी 24 एप्रिल रोजी 5,888 जणांना कोरोनाची लागण झाली होती. (detail information of Mumbai latest Corona update and Corona Second wave prediction)

याआधी मार्च महिन्यात रुग्ण पाच हजारांमध्ये 

एप्रिल महिन्यात राज्याच्या इतर भागासह मुंबईमध्येसुद्धा दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेलेली आहे. मुंबईत याआधी 31 मार्च या दिवशी 5394 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मुंबईत कोरोनाग्रस्तांमध्ये सातत्याने वाढ होत आली. तसेच रोज रुग्णसंख्या वाढून ही वाढ थेट 8 हजारांच्या पाढ्यात पोहोचली. मात्र आता मुंबईत रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसतोय.

मुंबईत दिवसभरात 64 जणांचा मृत्यू

मुंबईमध्ये मागील काही दिवसांपूसन मृतांच्या संख्येतसुद्धा सातत्याने वाढ झाल्याचे नोंदवले गेले. आज मुंबईत एकूण 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच यापैकी 36 जण याआधीच कोणत्यातरी आजाराने ग्रस्त होते. ही माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आजच्या एकूण मृतांमध्ये 28 महिलांचा समावेश असल्याचेसुद्धा मनपाने सांगितले. आजची आकडेवारी मिळून मुंबईमध्ये मृतांचा आकडा 12783 वर पोहोचला आहे.

रिकव्हरी रेट 86 टक्क्यांवर

मुंबईमध्ये नव्याने रुग्ण आढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. 25 एप्रिल रोजी नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. मुंबईत दिवसभरात 8478 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या रुग्णांनंतर मुंबईत बरे झालेल्यांची संख्या 5,37,711 वर पोहोचली आहे. तसेच सध्या मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 75,740 असून रिकव्हरी रेट हा 86 टक्क्यांवर पोहोचलाय.

राज्यातही नव्या रुग्णांची संख्या घटली, मृतांचे प्रमाण वाढले

राज्यामध्येसुद्धा नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले आहे. 25 एप्रिल रोजी नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या 24 एप्रिलच्या तुलनेत कमी आहे. 24 एप्रिल रोजी दिवसभरात एकूण 67,160 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. तर 25 एप्रिल रोजी 66191 नवे रुग्ण आढळले. तसेच एकीकडे रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 24 एप्रिल रोजी दिवसभरात एकूण 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर 25 एप्रिल रोजी दिवसभरात तब्बल 832 जणांनी आपला प्राण गमावला आहे.

लाट ओसरतेय की हा निर्बंधांचा परिणाम ?

दरम्यान, आजची नव्या रुग्णांची आणि बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी काहीशी  वाढली असली तरी कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय असे म्हणावे का ?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच सध्या राज्यात ब्रेक द चेन अंतर्गंत अनेक निर्बंध असल्यामुळे लाट ओसरली नसून हा निर्बंधांचा परिणाम आहे, असेसुद्धा अनेकांकडून सांगितले जात आहे. याच कारणामुळे रुग्ण कमी होत असले तरी सर्वांनी अजूनही तेवढीच काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update | मोठी बातमी ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, पण मृतांच्या संख्येत मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती ?

स्ट्रेचर, व्हिलचेअर न मिळण्याइतपत आरोग्य यंत्रणा कोलमडली, वर्ध्यात महिलेने आयसोलेशन कक्षापर्यंत जाण्याआधीच श्वास सोडला

(detail information of Mumbai latest Corona update and Corona Second wave prediction)

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.