AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | विधानसभेच्या जागा 2026 मध्ये वाढणार? देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेचा जागा आगामी काळात वाढणार असल्याबाबतचं महत्त्वाचं वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे नवं विधान भवन बांधण्याबाबतही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. फडणवीस यांच्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीदेखील याबाबत एक वक्तव्य केलं होतं.

Devendra Fadnavis | विधानसभेच्या जागा 2026 मध्ये वाढणार? देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 10:29 PM

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कार्यक्रमात नवं विधान भवन बांधण्याचा विचार सुरु असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या जागा 2026 मध्ये वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. विधानसभेच्या आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच अधिक आमदारांसाठी विधानसभेची इमारत तयार करण्याचा विचार सुरु असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

“आम्ही विधान परिषद आणि विधान सभेसाठी एक नवीन वास्तू बनविण्याचा विचार करत आहोत. आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ”, असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाच भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“सौमित्रने प्रोजेक्ट म्हणून विधानसभेचं रिडेव्हलपमेंट मोड्यूल तयार केलं आहे. ते मोड्यूल पाहिल्यानंतर मी अतुल भातखळकर यांना विचारलं की, आपण विधानसभेत असताना आपल्याला अशा विधानसभेत बसता येईल का? पण मला असं वाटतं येऊ शकतं. कारण आम्ही याबाबत विचारच करत होतो”,  असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“2026 मध्ये आपल्या विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. संपूर्ण देशातील विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. आमदारांची संख्या 300 जागा होण्याची शक्यता आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या देखील निवडणुका पार पडणार आहेत. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या जागांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.