देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; म्हणाले, “ते उत्तर देण्यालायक…”
उद्धव ठाकरे हे सर्व पक्षांचे नेते झाले आहेत. त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करावं. वन नेशन, वन इलेक्शन असा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. त्या नाऱ्याला समर्थन द्यावं. सर्व निवडणुका एकत्र करू.
गोविंद ठाकूर, प्रतिनिधी, मुंबई : बोरिवली येथे आमदार सुनील राणे यांनी कुस्तीची दंगल आयोजित केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज या कुस्तीची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि इराणचा हुसेन रमजानी यांच्या कुस्ती झाली. यात पृथ्वीराज पाटील विजयी झाला. याला चांदीची गदा देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकार यापुढे कुस्तीला प्रोत्साहन देत आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांनी मागाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यांना वादात टाकण्याचं काम केलं महाविकास आघाडीच्या वतीने केलं गेलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात चांगलं काम केलं. उद्धव ठाकरे असं काहीतरी बोलत असतात. संविधानांनानुसार एकत्र निवडणुका होत नाही. त्यांनी वन नेशन वन निवडणूक घेण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणावं. आता उद्धव ठाकरे यांना आता जैन समाज उत्तर भारतीय यांची आठवण येत आहे. त्यांच्याबाबत उत्तर देण्यास मी उभा नाही. संविधानानुसार निवडणूक होतील. बीएमसीची कुस्ती कधी होणार, असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर होईल.
राज्यपालांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला
राज्यपाल कोश्यारी यांना अनेक लोकांनी वादात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. कोश्यारी यांनी त्यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलं.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना रोखण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळं त्यांना रोखण्याचा हा राग होता. हे प्रकरण आता संपलं आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्राची सेवा केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
उद्धवजी काहीही बोलत असतात
उद्धवजी काहीतरी बोलत असतात. त्यात हिमतीचा काय विषय आहे. सध्यातरी भारतात सर्व निवडणुका एकावेळी घेता येऊ शकत नाही. उद्धव ठाकरे हे सर्व पक्षांचे नेते झाले आहेत. त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करावं. वन नेशन, वन इलेक्शन असा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. त्या नाऱ्याला समर्थन द्यावं. सर्व निवडणुका एकत्र करू.
उद्धव ठाकरे यांना आता जैन समाजाची आठवण यायला लागली. उत्तर भारतीयांची आठवण यायला लागली. अशीचं त्यांनी आठवण केली तर त्यांचा राजकारणात संबंध राहील, अशी किल्लीही देवेंद्र फडणवीस यांनी उडविली.