Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांची अजित पवार यांच्यावर खोचक टीका, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. त्यांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संतापाची लाट पसरली आहे. पडळकरांच्या वक्तव्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांची अजित पवार यांच्यावर खोचक टीका, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 4:51 PM

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्तेतील महत्त्वाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू तर सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना केली. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेमुळे एक नवा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदाराच सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यावर टीका करतोय, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिलीय. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तीनही पक्षातील नेत्यांचा कार्यकर्त्यांनी सन्मान राखायला हवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तीनही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी, तीनही पक्षाच्या नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा बिलकूल उपयोग करु नये, असं माझं स्पष्ट मत आहे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीय.

‘पडळकरांनी स्वत:ला आवर घालावा’, विखे पाटलांचा सल्ला

दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही. याउलट त्यांनी गोपीचंद पडळकर यांना कडक शब्दांत समज दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी कोणतंही वक्तव्य करताना स्वत:ला आवर घालावा, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

“गोपीचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासून आहे. ते एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे होते. आपण आता एकत्र असल्याने त्यांनी विधान करताना स्वतःला आवर घालावा. सरकारच्या स्थैर्यासाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावे”, असा सल्ला विखे पाटील यांनी दिला.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.