नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाच पुरावे देणार, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत. त्याबाबतचे पुरावे मी तुमच्यासमोर सादर करणारच आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही मी पुरावे देणार आहे. (devendra fadnavis reply to nawab malik over his allegations)

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाच पुरावे देणार, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 10:58 AM

मुंबई: नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत. त्याबाबतचे पुरावे मी तुमच्यासमोर सादर करणारच आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही मी पुरावे देणार आहे. नवाब मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बाँम्बच फोडणार आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांच्या आरोपांचं खंडन केलं. मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोतील व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं. मलिकांनी दिवाळीत लवंगी फटाका लावला, आता लक्षात ठेवावं आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेल. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यांनी माझ्याशी बोलू नये. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत याचे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. पण शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहे. दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली. त्याला अंतापर्यंत न्यावे लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

पुराव्याशिवाय मी आरोप करत नाही

मी काचेच्या घरात राहत नाही. तसेच माझ्यासाठी हा काही सिनेमा नाही. हे गंभीर प्रकरण आहे. त्याला मी धसास लावणारच आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय आरोप करत नाही. फडणवीसांवर आरोप मागे घेण्याची कधीच वेळ आली नाही. आम्ही कधीच आरोप मागे घेतले नाही, असं ते म्हणाले.

फक्त पत्नीसोबतचाच फोटो का ट्विट केला?

मलिकांनी चार वर्षापूर्वीचा फोटो ट्विट केला आहे. त्यांना हा फोटो आज सापडला. रिव्हरमार्च ही संघटना आहे. त्यांना रिव्हर अँथमवर गाणं करायचं होतं. त्यावेळी हा फोटो घेण्यात आला आहे. चौगुले म्हणून आहेत. त्यांनी विनंती केली म्हणून आम्ही त्या मोहिमेशी जोडलो गेलो. माझी पत्नीही त्यांना मदत करत होती. त्यांनी गाणं तयार केलं होतं. त्यावेळी हे फोटो काढले होते. माझ्याही सोबत फोटो काढले आहे. पण मलिक यांनी जाणीवपूर्वक पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. त्यामागची मानसिकता समजून घेतली पाहिजे, असं सांगतानाच मलिक यांनी माझा फोटो ट्विट केला नाही. कारण माझ्यासोबत कोणीही फोटो काढू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे माझ्याबरोबरचा फोटो ट्विट केला असता तर आरोप फुसका ठरला असता, असं ते म्हणाले.

मग सर्व एनसीपीच ड्रग्ज माफिया म्हणायची का?

हे रिव्हर मार्च सोबत आलेले हे लोकं होते. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही.भाजपचं ड्रग्ज कनेक्शन आहे असं मलिक म्हणाले. पण मलिकांचे जावई ड्रग्ज सोबतच सापडले आहेत. मग हाच नियम लावला तर संपूर्ण एनसीपी ड्रग्ज माफिया झाली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला

नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…

Maharashtra News LIVE Update | मलिकांनी लवंगी लावला, दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार – देवेंद्र फडणवीस

(devendra fadnavis reply to nawab malik over his allegations)

दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.