साताऱ्यातील जिहे कठापूर योजनेला केंद्राकडून 247 कोटी मिळणार, भाजप नेत्यांची दिल्लीवारी यशस्वी, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे महाराष्ट्रातील एका प्रकल्पाला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले आहेत.

साताऱ्यातील जिहे कठापूर योजनेला केंद्राकडून 247 कोटी मिळणार, भाजप नेत्यांची दिल्लीवारी यशस्वी, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट
भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट फेब्रुवारी महिन्यात घेतली होती.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 8:47 PM

मुंबई: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे महाराष्ट्रातील एका प्रकल्पाला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले आहेत. तो प्रकल्प सातारा जिल्ह्यातील आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना म्हणजेच जिहे कठापूर योजना (Jihe Kathapur Scheme) प्रधानमत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. जिहे कटापूर योजनेचा एआयबीपी योजनेत समावेश करुन त्याला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या सोबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांचा फोटो ट्विट केला आहे. या नेत्यांनी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय?

गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा (जिहे-कठापूर) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केंद्रीय प्रकल्प म्हणून समावेश केल्याबद्दल तसेच यासाठी 247 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या दुष्काळी भागाला या प्रकल्पाचा मोठा लाभ यामुळे होणार असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा आमच्याच काळात पूर्ण झाला आणि त्यासाठी संपूर्ण निधी सुद्धा आमच्या सरकारने दिला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

जिहे कठापूर योजना मार्गी लागावी म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या संसदीय समितीचे सदस्य म्हणून प्रयत्न केले आहेत. जिहे कठापूर योजनेमुळं 27 हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असून हजारो शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फेब्रुवारी महिन्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि नरेंद्र मोदींची भेट

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि सदाभाऊ खोत यांनी ससंदेत नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. जिहे कठापूर योजनेला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट केल्याचं पत्र आजच राज्यसरकारच्या जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीच्या मृत्यूनंतर जावई, नातवांचाही हक्क! दिल्ली कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Sanjay Raut Video: सकाळी राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांविरोधात ‘कठोर’ झालेले राऊत दुपारपर्यंत ‘मवाळ’ कसे झाले? गृहकलह मिटला?

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.