देशमुखांना वाचवण्यासाठी पवारांकडे पुरावे, त्या पुराव्याविरोधात फडणवीसांचा VIDEO पुरावा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. (devendra fadnavis slams sharad pawar over anil deshmukh's home isolation)

देशमुखांना वाचवण्यासाठी पवारांकडे पुरावे, त्या पुराव्याविरोधात फडणवीसांचा VIDEO पुरावा
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, असे गिरीश बापट यांनी म्हटले.
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 3:07 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वॉरंटाईन होते तर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सुरक्षारक्षकांच्या लवाजम्यात पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. (devendra fadnavis slams sharad pawar over anil deshmukh’s home isolation)

देवेंद्र फडणवीस यांनी थेट 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला. “देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यातून फडणवीस यांना परमबीर सिंग यांनी केलेला दावा खरा असल्याचं म्हटलं आहे.

रुग्णालयात जाताना पत्रकार परिषद?

दरम्यान, अनिल देशमुख यांना कोरोना झाल्याने ते भरती होण्यासाठी रुग्णालयात जात होते. तेव्हा पत्रकारांनी अडवल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, देशमुख यांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही.

कशासाठी होती पत्रकार परिषद

शेतकरी आंदोलनावर भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट केलं होतं. यावरून देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे गदारोळ उठला होता. म्हणून देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. (devendra fadnavis slams sharad pawar over anil deshmukh’s home isolation)

काय म्हणाले पवार?

परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल शरद पवारांनी केला आहे. (devendra fadnavis slams sharad pawar over anil deshmukh’s home isolation)

संबंधित बातम्या:

मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल, राजधानीत शरद पवारांचा हुंकार

वाझे-देशमुख यांची भेट झाल्याचा दावा चुकीचा; शरद पवारांनी केली परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड

LIVE | पत्रकारांच्या प्रश्नांना शरद पवार म्हणाले “इनफ इज इनफ”

(devendra fadnavis slams sharad pawar over anil deshmukh’s home isolation)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.