Dhananjay Munde Case: अ‌ॅड. रमेश त्रिपाठींनी रेणू शर्मांची केस सोडली, तक्रार मागे घेताच निर्णय

रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताच त्यांचे वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनीसुद्धा रेणू  यांची केस सोडल्याचे समोर आले आहे. (Adv.Ramesh Tripathi Renu sharma)

Dhananjay Munde Case: अ‌ॅड. रमेश त्रिपाठींनी रेणू शर्मांची केस सोडली, तक्रार मागे घेताच निर्णय
रमेश त्रिपाठी यांनी रेणू शर्मांची केस सोडली आहे.
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 9:01 AM

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पार्श्वगायिका रेणू शर्मा (Renu sharma) यांनी तक्रार मागे घेतली आहे.  त्यानंतर शर्मा यांनी तक्रार मागे घेताच त्यांचे वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी (Adv.Ramesh Tripathi) यांनीसुद्धा रेणू यांची केस सोडली आहे.  (Adv.Ramesh Tripathi dropped the Renu sharma rape case)

तक्रार मागे घेताच केस सोडली

धनंजय मुंडे यांच्यावर बलाताकाराचे आरोप झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. आरोपांचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी आग्रही मागणी भाजपकडून केली जात होती. मात्र, त्यांनतर आता अचानक रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. यावेळी बोलताना हा आमचा कौटुंबिक वाद आहे. या प्रकाराला राजकीय वळण मिळाल्यामुळे मी ही तक्रार मागे घेतली असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं. शर्मा यांनी तक्रार मागे घेताच, ही केस लढवणारे त्यांचे वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनी शर्मा यांची केस सोडली आहे.

रेणू शर्मांची बाजू खंबीरपणे लावून धरणारे त्रिपाठी

रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यापासून अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनी रेणू यांची बाजू लावून धरली होती. रेणू शर्मा यांच्यावर अत्याचार झाल्याचा दावा त्रिपाठी यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला होता. रेणू यांची केस घेतल्यामुळे मागील काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याचंही त्रिपाठी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यामुळे रमेश त्रिपाठी यांनीसुद्धा केस सोडली आहे.

दरम्यान, रेणू शर्मा यांनी अचानकपणे तक्रार मागे घेणे हे धक्कादायक असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या. अशा प्रकारामुळे खऱ्या बलात्कार पीडितांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. समाजात चुकीचं उदाहरण सेट होऊ शकतं, असेही वाघ म्हणाल्या. असे प्रकार भविष्यात घडू नयेत त्यामुळे रेणू शर्मा यांच्यावर करावाई करण्याची मागणीही यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपचे कृष्णा हेगडे म्हणतात ‘सत्यमेव जयते’

Dhananjay Munde Case : बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी

(Adv.Ramesh Tripathi dropped the Renu sharma rape case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.