एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचे नाव द्यावे, धनंजय मुंडे यांनी केली मागणी

एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचे नाव द्यावे, धनंजय मुंडे यांनी केली मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 10:31 PM

मुंबई : गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. त्याच धर्तीवर पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट मैदानाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचे नाव देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ही मागणी धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांना केली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास शरद पवार यांच्या नावाने पुण्यात क्रिकेटचे स्टेडियम होऊ शकते. शरद पवार यांनी क्रिकेट विश्वात मोठी कामगिरी केली. याची पावती त्यांच्या नावाच्या रुपाने स्टेडियम होऊन मिळू शकते.

स्टेडियमला शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी

पुण्यातील गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेब यांचे नाव या स्टेडियमला देण्याची मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांचे क्रिकेट जगतात मोठे काम

एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरद पवार यांचे क्रीडा विश्वात आणि विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे.

भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवार साहेबांच्या कारकिर्दीत होऊ शकले. याचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे मैदानात

गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीच्या पुणे येथील गहुंजे स्टेडियमला शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांच्याकडे केली आहे. मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स या आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी धनंजय मुंडे हे स्वतः मैदानात पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.