AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या बदलीसाठी संभाजी ब्रिगेडकडून धरणे आंदोलन

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम मधून त्वरित बदली करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून आज धरणे आंदोलन करण्यात आलं तर पूजा खेडकर यांना विनाकारण त्रास दिला जात असून त्यांना संरक्षण देण्यात यावं यासाठी ओबीसी संघटनांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं.

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या बदलीसाठी संभाजी ब्रिगेडकडून धरणे आंदोलन
पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेटImage Credit source: tv9
| Updated on: Jul 16, 2024 | 4:15 PM
Share

संभाजी ब्रिगेड कालपासूनच आक्रमक झाली असून पूजा खेडकर यांच्या सर्व प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करावी. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी या मागणीसाठी त्यांनी आज धरणे आंदोलन केलं. तर पुढील काळात राज्यभरात संभाजी ब्रिगेड आणखी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा  संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी दिला.

दुसरीकडे ओबीसी संघटना ही आता पूजा खेडेकर यांच्या समर्थनार्थ उतरल्या असून त्यांची विनाकारण बदनामी केली जात आहे. त्या चौकशी समिती समोर आपली बाजू मांडणारच आहेत तेव्हा खरं खोटं काय आहे ते चौकशीमध्ये सिद्ध होईल. मात्र राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जे ते निर्माण करण्याचं वातावरण होत आहे त्यातूनच पूजा खेडकर यांना सुद्धा त्रास दिला जात असल्याचा आरोप ओबीसी संघटनांकडून केला गेला आहे .

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर शेतकऱ्यांला धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातील घराला कुलूप लावून घरातील सगळे सदस्य बाहेर गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा घरातील पालिकेच्या पाण्याचा नळ सुरु असल्याचे सांगितले जातेय. पालिकेच्या नळाला पाणी आल्यानंतर सलग 4 ते 5 तास हा नळ चालू असतो. त्यामुळे गेल्या 2 दिवसात हजारो लीटर पाणी यातून वाया गेले आहे. त्यामुळे आता खेडकरांच्या घराबाहेरील गेटचे कुलूप उघडून महापलिका हा नळ बंद करणार का? हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेल्यामुळे आता महापालिका खेडकरांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री पूजा खेडकर यांच्या शासकीय विश्रामगृहात पोलीस गेले होते. रात्री 11 वाजताच्या दरम्यान तीन महिला पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये गेल्या होत्या त्यावेळी आतमध्ये नेमकी कोणती चौकशी केली की विश्रामगृहाची झडती घेतली याबद्दल कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.